अहिल्यानगर : अहिल्यानगरमध्ये राहत्या घरी एका व्यक्तीचा खून झाला होता. शेवटी या घटनेचा उलगडा सुटला आहे. भाळावस्ती परिसरात घडलेल्या निर्घृण खुनाचा शेवटी आरोपी सापडला आहे. आर्थिक व्यवहार आणि सततच्या पैशाच्या मागणीतून भाच्यानेच आपल्या मामाचा खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
६ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास शिंदा येथील भाळावस्तीमध्ये हनुमंत गोरख घालमे ( वय ३५ ) हे आपल्या राहत्या घरात झोपले असताना अज्ञाताने त्यांच्या डोक्यात हत्याराने घाव घालून त्यांची हत्या करण्यात आली होती. हा सगळा प्रकार रात्रीच्या अंधारात घडल्यामुळे कोणालाही याची कानोकान खबर लागली नाही, परंतु सकाळी घरातील हे चित्र पाहता संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणाची कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलाम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांच्या कसून तपास, नात्यातील रक्तरंजित कट उघड
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी सूत्रे हाती घेतली. दोन स्वतंत्र पथके तयार करून तांत्रिक तपास, कौशल्यपूर्ण चौकशी आणि आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेत सलग १५ दिवस तपास करण्यात आला. तपासात धक्कादायक माहिती समोर आली. मयत हनुमंत घालमे यांच्यावर मोठे कर्ज होते. ते वेळोवेळी आपल्या भाचा तेजस अनभुलेकडे पैशाची मागणी करत होते. यापूर्वी तेजस व त्याच्या आई-वडिलांनी आर्थिक मदतही केली होती. मात्र, अलीकडेच घालमे यांनी थेट १० लाख रुपयांची मागणी केल्याने कुटुंबाने नकार दिला.
पैशे देण्यास नकार दिल्यानंतर घालमे यांनी भाचा आणि त्याच्या आई-वडिलानं जीवे मारण्याची धमकी दिली होती. हे सर्व तपासात समोर आले. धमक्यांना आणि सततच्या सततच्या पैशाच्या मागणीला कंटाळून आरोपी तेजस अनभुले याचे संतापाच्या भरात मामाचं डोक्यात वार करून त्याचा खुन केल्याची कबुली पोलीस चौकीत दिली. आरोपीला अटक करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी त्याला कर्जत पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलं आहे.






