प्रतिनिधी: एकीकडे आठव्या वेतन आयोगाची चर्चा जोरात असताना वेतन आयोगाच्या अहवालातील शिफारशी आयोग अध्यक्षा रंजना देसाई यांना सुपूर्द करण्यात आल्या होत्या. लवकरच सरकार यावर अंतिम निर्णय घेणार आहे. दरम्यान उपलब्ध माहितीनुसार, सरकार अंतिम चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या व निवृत्तीधारक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळ प्रतिनिधींशी बैठक उद्या २५ जानेवारी रोजी घेणार आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या व सूचनांची दखल घेण्यासाठी ही बैठक होणार असल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार, रेल्वे, संरक्षण, टपाल, आयकर आणि इतर केंद्र सरकारी सेवांमधील कर्मचारी आणि पेन्शनर संघटनांसह अनेक प्रमुख विभागांच्या प्रतिनिधींना बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. नॅशनल काऊन्सिल (कर्मचारी) व संयुक्त सल्लागार मशिनरी (Joint Consultative Machinery NC JCM) यांच्या संयुक्त बैठकीतून सरकार वेतन आयोगात संबंधित ठोस निर्णय घेण्यासाठी विचार विनिमय करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता १३-सी, फिरोजशाह रोड, नवी दिल्ली येथे होणार आहे.
एनसी-जेसीएमचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी मसुदा समितीच्या सदस्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वेतन आयोगाचे कार्यालय पूर्णपणे कार्यान्वित झाल्यावर, परिषदेला सेवा-संबंधित मुद्द्यांवर आपले निवेदन सादर करण्यास सांगितले जाण्याची शक्यता आहे. तसेच विविध मुद्द्यांवरील प्रस्तावांना अंतिम रूप देण्यासाठी सविस्तर चर्चा अपेक्षित असल्याने, सदस्यांना सुमारे एक आठवडा दिल्लीत थांबावे लागू शकते असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे.