Saturday, January 24, 2026

जिओ फायनांशियल सर्विसेसकडून आपली उपकंपनी जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर लिमिटेडची नोंदणी

जिओ फायनांशियल सर्विसेसकडून आपली उपकंपनी जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर लिमिटेडची नोंदणी

मोहित सोमण: जिओ फायनान्स लिमिटेड (Jio Finance Limited) कंपनीने आज आपली संपूर्ण मालकीची असलेली जिओ अल्टरनेटिव इन्व्हेसमेंट मॅनेजर (Jio Alternative Investment Manager) लिमिटेड कंपनी नोंदणीकृत करण्यात आली असल्याचे कंपनीने आज एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीत कंंपनी १० रूपये दर्शनी मूल्य (Face Value) प्रमाणे १० लाख शेअर माध्यमातून १ कोटींची प्रारंभिक गुंतवणूक करणार आहे. याविषयी एक्सचेंज फायलिंगमध्ये माहिती देताना,कंपनी जेएआयएमएलच्या प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्याच्या १०००००० इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक वर्गणीसाठी १ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल असे कंपनीने म्हटले. तसेच हा व्यवहार संबंधित पक्षांच्या व्यवहारांच्या कक्षेत येत नाही आणि कंपनीचे प्रवर्तक (Promoter) प्रवर्तक गट आणि समूह कंपन्यांपैकी कोणाचाही उपरोक्त व्यवहारात कोणताही हितसंबंध नाही. कंपनीचे नोंदणी प्रमाणपत्र कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून, ईमेलद्वारे, २३ जानेवारी २०२६ रोजी प्राप्त झाले असे कंपनीने सांगितले.

एआयएफ इन्व्हेसमेंट (Alternative Investment Fund AIF Investment) हा गुंतवणूकीचा एक आधुनिक प्रकार आहे. या माध्यमातून उच्च उत्पन्न, अथवा अति उच्च उत्पन्न असलेल्या गुंतवणूकदारांना इक्विटी, डेट, व म्युच्युअल फंड या पर्यायांव्यतिरिक्त एक वेगळा पर्यायी गुंतवणूकीचा मार्ग विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूकीसाठी खुला होता. हा पर्याय मोठ्या प्रमाणात परतावा देत असला तरी तुलनेने तो कमी सेबी नियंत्रित आहे आणि हा पर्याय गुंतवणूकदारांसाठी जोखमेचा पर्याय म्हणून ओळखला जातो. किमान १ कोटींची गुंतवणूक या उत्पादनात करणे आवश्यक असते.

जिओ फायनांशियल सर्विसेस कंपनीने नुकताच आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीने मजबूत आर्थिक निकाल नोंदवला होता. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या उत्पन्नात इयर ऑन इयर बेसिसवर थेट १०१% वाढ झाली होती ज्यात उत्पन्न डिसेंबर पर्यंत ९०१ कोटीवरून वाढत १९०४९ कोटींवर पोहोचले होते. जिओ फायनांशियल सर्विसेह ही एक वित्तीय सेवा देणारी कंपनी असून कंपनीचा शेअर काल ३.५८% घसरत २५३.२९ रुपयांवर बंद झाला होता. गेल्या ५ दिवसांत कंपनीच्या शेअर्समध्ये ९.३४% घसरण झाली आहे तर गेल्या महिन्यात शेअर्समध्ये १५.२९% घसरण झाली होती.तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र ३.५८% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये १४.३७% घसरण झाली आहे.

Comments
Add Comment