पंजाबमध्ये प्रजासत्ताक दिनापूर्वी रेल्वे रुळावर स्फोट

अमृतसर : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर स्फोट झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडली. इंजिन जात असताना स्टेशनच्या आउटर लाईनवर हा स्फोट झाला. या घटनेत एका लोको पायलटला किरकोळ दुखापत झाली. जीआरपीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस आणि फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)च्या पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले आहेत. हा स्फोट दहशतवादी कटाचा भाग होता की तांत्रिक बिघाडामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. रोपड रेंजचे डीआयजी नानक सिंग यांनीही घटनास्थळी भेट दिली.पोलीस प्रशासनाच्या मते, इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळेही हा स्फोट झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रेल्वेचे तांत्रिक तज्ज्ञ याची स्वतंत्र चौकशी करत आहेत. स्फोटामुळे इंजिनच्या काचा फुटल्या असून रेल्वे रुळांचेही थोडे नुकसान झाले आहे. प्रजासत्ताक दिन जवळ असल्याने सुरक्षा यंत्रणा पूर्ण सतर्क आहेत.


पोलिसांनी स्पष्ट केले आहे की,मालगाडीवरील सुरक्षा अधिकारी अनिल शर्मा (सेफ्टी ऑफिसर, डीएफसीसी) यांना अत्यंत किरकोळ दुखापत झाली असून ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. संबंधित रेल्वे मार्गावर केवळ मालगाड्यांचीच वाहतूक होते, त्यामुळे प्रवासी गाड्या किंवा सामान्य नागरिकांना कोणताही धोका नसल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे.या घटनेनंतर राज्याच्या राजकारणातही खळबळ उडाली आहे. पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वडिंग यांनी रेल्वे ट्रॅकजवळील स्फोट ही सामान्य घटना नसून, पंजाबमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला. तर शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत, राज्यातील ढासळती कायदा व सुव्यवस्था यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे.

Comments
Add Comment

जाणून घ्या कशी असेल ७७ व्या प्रजासत्ताक दिनाची परेड ?

नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी नवी दिल्लीत कर्तव्य

मुलीला अंक लिहिता आले नाही म्हणून पित्याकडून बेदम मारहाण!

चार वर्षांच्या मुलीचा दु:खद अंत हरियाणा : हल्ली पालकांकडूनच मुलांवर शिक्षणाच्या बाबतीत अतिरिक्त ताण टाकला जातो.

इंडिगोचे ७१७ फेऱ्या रद्द

इतर एअरलाईनला संधी नवी दिल्ली : डिसेंबरच्या सुरुवातीला झालेल्या मोठ्या उड्डाण गोंधळानंतर नागरी विमान वाहतूक

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यंत्रमानव ‘एएससी अर्जुन’ तैनात

माहितीच्या सहाय्याने प्रवाशांशी संवाद साधण्याची क्षमता विशाखापट्टणम : सध्याचे जग कृत्रिम बुद्धिमत्ता व

एका महिन्यात ९०० कुत्र्यांची हत्या

तेलंगणा : तेलंगणामधील जगतियाल जिल्ह्यातील पेगाडपल्ली गावात सुमारे ३०० भटक्या कुत्र्यांना मारण्यात आले आहे. या

५ राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

थंडी आणखी वाढणार नवी दिल्ली : देशभरात हवामानाचा लहरीपणा वाढताना दिसत असून कधी कडाक्याची थंडी तर कधी अचानक