Border 2 Collection Day 1: सनी देओलच्या ‘बॉर्डर 2’चा बॉक्स ऑफिसवर पहील्याच दिवशी धुमाकुळ

बॉर्डर २: सनी देवलच्या बॅार्डर २ या चित्रपटाने बॅाक्स ऑफिसवर आपली वेगळीच धमाल केली आहे.देशभक्ती, ॲक्शन आणि भावनिक कथानकाच्या जोरावर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळवला आहे. भारतातील बॉक्स ऑफिसवर ‘बॉर्डर 2’ ने छप्परफाड ओपनिंग करत पहिल्या दिवशी तब्बल ३० कोटी रुपयांची नेट कमाई केली आहे.

देशांतर्गत बाजारपेठेत या चित्रपटाने आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ला मागे टाकले असले, तरी जागतिक स्तरावर मात्र ‘धुरंधर’चा पहिल्या दिवसाचा विक्रम मोडण्यात ‘बॉर्डर 2’ थोडक्यात अपयशी ठरला आहे. ‘धुरंधर’ने पहिल्या दिवशी जागतिक बॉक्स ऑफिसवर ४१.५ कोटींची कमाई केली होती, तर ‘बॉर्डर 2’चा जागतिक कलेक्शनचा आकडा ४१ कोटींवर स्थिरावला आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ओव्हरसीज मार्केटमध्ये ‘बॉर्डर 2’ची मर्यादित कमाई. परदेशात या चित्रपटाने सुमारे ५ कोटींची कमाई केली, तर ‘धुरंधर’ने ७.७० कोटी रुपये कमावले होते.

उत्तर भारतात आणि सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये सनी देओलच्या लोकप्रियतेचा मोठा फायदा ‘बॉर्डर 2’ला मिळताना दिसत आहे. २६ जानेवारीचा मोठा विकेंड समोर असल्याने, येत्या काही दिवसांत हा चित्रपट ‘धुरंधर’चा जागतिक विक्रम मोडेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘बॉर्डर 2’ची कथा १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असून भारतीय भूदल, नौदल आणि वायुदलाच्या शौर्याची गाथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात सैनिकांच्या कुटुंबातील भावना दाखवण्यात आल्या आहेत, तर उत्तरार्धात थरारक युद्धदृश्ये पाहायला मिळतात. सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या अभिनयामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरतो. दिग्दर्शक अनुराग सिंग यांनी युद्धपटाला मानवी संवेदनांची जोड देत एक दमदार अनुभव प्रेक्षकांसमोर ठेवला आहे.
Comments
Add Comment

Konkan Hearted Girl : कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने शेअर केली गुड न्यूज; घरी आली नवी ‘लक्ष्मी’...

बिग बॉस मराठी ६ मधील लोकप्रिय स्पर्धक आणि सोशल मिडीयावर प्रसिध्द असणारी ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी

Border 2 Movie Review : बॉक्स ऑफिसवर 'बॉर्डर २'चा धिंगाणा! २९ वर्षांनंतरही सनी देओलचा तोच दरारा; चाहत्यांच्या थिएटरमध्ये शिट्ट्या आणि टाळ्या

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित युद्धावर आधारित चित्रपट 'बॉर्डर'चा वारसा २९ वर्षांनंतर

कमल आर खानला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी; मुंबईतील एका निवासी इमारतीवर झाडल्या गोळ्या

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल आर खान याला ओशिवरा गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केली

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश