सिंधुदुर्ग : काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष असल्याचे दाखवून दिले. आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्येही भारतीय जनता पार्टीच फॉर्मात असल्याचे चित्र आहे. राज्यातील बारा जिल्हा परिषदा आणि या जिल्हा परिषदांतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांसाठी पाच फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी सात फेब्रुवारी रोजी होणार आहे. पण मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. यात भाजपच्या दहा आणि शिवसेनेच्या एका उमेदवाराचा समावेश आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजप - शिवसेना महायुती निवडणूक लढवत आहे. तसेच सिंधुदुर्ग अंतर्गत कणकवली तालुका पंचायत समिती, देवगड तालुका पंचायत आणि वैभववाडी तालुका पंचायत समिती येथे महायुती निवडणूक लढवत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या निवडणुकांमध्ये मतदान होण्याआधीच महायुतीचे ११ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद
- खारेपाटण जि.प.उमेदवार; प्राची इस्वलकर(भाजप)
- जाणवली जिल्हा प.रुहिता राजेश तांबे (शिवसेना)
- पडेल जिल्हा प.(देवगड)सुयोगी रवींद्र घाडी (भाजप)
- बापर्डे जिल्हा प. (देवगड)अवनी अमोल तेली (भाजप)
- बांदा जिल्हा प. उमेदवार प्रमोद कामत (भाजप)
कणकवली तालुका पंचायत समिती
- बिडवाडी - संजना संतोष राणे (भाजप )
- वरवडे - सोनू सावंत (भाजपा)
देवगड तालुका पंचायत समिती
- पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप)
- नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप)
- बापर्डे – संजना संजय लाड (भाजप)
वैभववाडी तालुका पंचायत समिती
- कोकिसरे - साधना सुधीर नकाशे (भाजप)






