Saturday, January 24, 2026

Harbour AC local Update : हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल; 'या' तारखेपासून प्रवाशांना मिळणार ‘कूल’ प्रवासाचा अनुभव

Harbour AC local Update : हार्बर मार्गावर पुन्हा एसी लोकल; 'या' तारखेपासून प्रवाशांना मिळणार ‘कूल’ प्रवासाचा अनुभव

नवी मुंबई : मुंबईकर लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने २६ जानेवारीपासून हार्बर मार्गावर पुन्हा एकदा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यासोबतच पश्चिम रेल्वेवरही एसी लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. त्यामुळे दररोजच्या प्रवासात प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा मिळणार आहेत.

रेल्वेच्या नव्या नियोजनानुसार प्रजासत्ताक दिनापासून सीएसएमटी, वडाळा रोड ते पनवेल या हार्बर मार्गावर एकूण १४ एसी लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यासाठी काही निवडक वेळच्या सामान्य लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, त्या वेळेत एसी लोकल धावतील. गर्दीच्या वेळेत होणारे हे बदल लक्षात घेता प्रवाशांना वेळापत्रक तपासून प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हार्बर मार्गावर यापूर्वी १ डिसेंबर २०२१ रोजी एसी लोकलची सुरुवात करण्यात आली होती. मात्र सामान्य लोकलच्या तुलनेत एसी लोकलचे तिकीट आणि पास महाग असल्याने प्रवाशांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. यामुळे काही काळासाठी हार्बर मार्गावरील एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. आता नव्या वेळापत्रकासह आणि मर्यादित फेऱ्यांद्वारे पुन्हा ही सेवा सुरू करण्यात येत आहे.

हार्बर मार्गावरील एसी लोकलचे वेळापत्रक

पहाटे ४.१५ वाशी-वडाळा रोड सकाळी ६.१७ पनवेल-सीएसएमटी सकाळी ९.०९ पनवेल-सीएसएमटी दुपारी १२.०३ पनवेल-वडाळा रोड दुपारी २.३१ पनवेल-सीएसएमटी दुपारी ४.५५ वाशी-वहाळा रोड संध्याकाळी ६.३७ पनवेल-सीएसएमटी सकाळी ५.०६ वडाळा रोड-पनवेल सकाळी ७.४० सीएसएमटी-पनवेल सकाळी १०.३४ सीएसएमटी-पनवेल दुपारी १.१७ वडाळा रोड-पनवेल दुपारी ३.५४ सीएसएमटी-वाशी संध्याकाळी ५.३० वडाळा रोडा-पनवेल रात्री ८ सीएमएमटी-पनवेल

या निर्णयामुळे हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार असून, दैनंदिन प्रवासात मोठा दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >