सुधागड : रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात आगामी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, तालुक्याचे राजकीय चित्र आता स्पष्ट झाले आहे. एकूण ३४ उमेदवारांनी आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उडी घेतली असून, राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांसह अपक्षांची मोठी संख्या असल्याने यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.
जिल्हा परिषद गटनिहाय उमेदवार: १. जांभूळपाडा गट क्र. १९ (सर्वसाधारण महिला): या गटात एकूण ५ महिला उमेदवार आमनेसामने आहेत. यामध्ये नीलिमा धैर्यशील पाटील (भाजप), शर्मिला शरद बोडके (शिवसेना), भारती भास्कर शेळके (शेकाप), दिपाली भोईर (शिवसेना) आणि अपूर्वा गणेश कानडे (अपक्ष) यांचा समावेश आहे.
२. राबगाव गट क्र. २० (अनुसूचित जमाती): येथे सर्वाधिक ७ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. मंगेश गोविंद निरगुडे (भाजप), काशिनाथ ताया हंबीर (शेकाप), किशोर भिकू डोके (भारतीय कामगार पक्ष), किसन नारायण उमटे (अपक्ष), चंद्रकांत कृष्णा वारगुडा (भाजप), दीपाली दिलीप भोईर (शिवसेना) आणि विश्वास अनंत भोय (अपक्ष) रिंगणात आहेत.
पंचायत समिती गणनिहाय उमेदवार :
परळी गण क्र. ३७ (ना.मा.प्र. महिला): ३ उमेदवार - प्रणिता राजेश परदेशी ( उबाठा), सुनंदा विठ्ठल सिनकर (भाजप) आणि स्वप्ना प्रवीण कुंभार (शेकाप). जांभूळपाडा गण (सर्वसाधारण): ५ उमेदवार - जागृती राजेश मानकर (भाजप), अतिश गोविंद सांगळे (शेकाप), हर्षदा मारुती शिंदे (मनसे), स्वप्निल अनंत गायकवाड (वंचित बहुजन आघाडी) आणि रमेश रामभाऊ सुतार ( उबाठा). राबगाव गण क्र. ३९ (अ.ज. महिला): ५ उमेदवार - मनीषा भरत डोके (शेकाप), शशिकला शरद दापसे (शेकाप), सुनीता किसन लेंडी (भाजप), पूजा नितीन हंबीर (भाजप) आणि चित्रा चंद्रकांत वाघमारे (अपक्ष). अडुळसे गण क्र. ४० (सर्वसाधारण) : या गणात सर्वाधिक ९ उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. यामध्ये शिवसेना उबाठा, शेकाप, मनसे, राष्ट्रवादी यांसह ४ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीची धामधूम अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता प्रचाराला वेग येणार आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि शेकाप-मनसे यांसारख्या पक्षांनी आपल्या ताकदीनिशी उमेदवार उतरवणार आहेत. यामुळे अपक्ष उमेदवार कोणाची मते खाणार आणि कोणाचे वर्चस्व राहणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






