Friday, January 23, 2026

पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

पश्चिम रेल्वेचे दोन गाड्यांच्या टर्मिनल आणि डब्यांच्या रचनेत तात्पुरते बदल

मुंबई कर्णावती एक्सप्रेस वांद्रे टर्मिनस येथून आणि वंदे भारत एक्सप्रेस २० डब्यांच्या रेकसह धावणार

मुंबई  : २२ जानेवारी २०२५ - गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल कर्णावती एक्सप्रेसचे टर्मिनल मुंबई सेंट्रलवरून वांद्रे टर्मिनस येथे हलवणे, आणि (ii) गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद – मुंबई सेंट्रल वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १६ वरून २० डब्यांपर्यंत तात्पुरती वाढ करणे यांचा समावेश आहे.

गाडी क्रमांक २२९६१/२२९६२ मुंबई सेंट्रल – अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेसमध्ये तात्पुरत्या स्वरूपात चार अतिरिक्त डबे जोडले जातील आणि २६ जानेवारी ते ७. मार्च या कालावधीत ही गाडी २० डब्यांच्या रेकसह धावेल. गाडी क्रमांक १२९३३/१२९३४ वांद्रे टर्मिनस – वात्वा / अहमदाबाद – वांद्रे टर्मिनस कर्णावती एक्सप्रेस तात्पुरत्या स्वरूपात २६. जानेवारी ते ०७ मार्च या कालावधीत मुंबई सेंट्रलऐवजी वांद्रे टर्मिनस येथून सुटेल/येईल. गाडी क्रमांक १२९३३ वांद्रे टर्मिनसवरून दुपारी १ . ५५ वाजता सुटेल, तर गाडी क्रमांक १२९३४ वांद्रे टर्मिनस येथे १२:३० वाजता पोहोचेल; बोरीवली आणि अहमदाबाद दरम्यानच्या उर्वरित वेळेत कोणताही बदल नाही.

Comments
Add Comment