भय आणि भ्रमाच्या विळख्यातला थरार ‘सालबर्डी’

मुंबई : इतिहासाच्या गर्भात दडलेल्या अनेक रहस्यांचा कधीच शोध लागत नाही, ती नेहमीच अनुत्तरीतच रहातात. काहींचा शोध घेताना ती अजून वेगळया रहस्यांना जन्म देतात. महाराष्ट्रातल्या दुर्गम भागात असलेल्या ‘सालबर्डी’ या गावातल्या अशाच एका रहस्याचा आणि तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांच्या शोधाची कहाणी सांगणारा ‘सालबर्डी’ हा थरारपट एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


नेब्यूला फिल्म्स निर्मित ‘सालबर्डी’ चित्रपटाची निर्मिती अनिल देवडे पाटील, डॉ.गजानन जाधव, राम जाधव यांनी केली आहे. रमेश साहेबराव चौधरी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. ‘सालबर्डी’ चित्रपटाच्या प्रदर्शित झालेल्या पोस्टरमधून या चित्रपटाच्या विषयाची भीषणता अधोरेखित होत आहे. या गावात घडणाऱ्या रहस्यमय घटनांचा तपास आणि त्या तपासाअंती बाहेर येणारं काळकभिन्न वास्तव हा या चित्रपटाचा गाभा आहे.


भय आणि भ्रमाच्या विळख्यातल्या अनपेक्षित घटनेमागच्या शोधाचे ‘रहस्य’ शोधताना काय होणार? हे सत्य कोण आणि कसं बाहेर काढणार? हे पहाणं अतिशय थरारक असणार आहे. भीती, थरार, विश्वास-अविश्वास यांचा अकल्पित अनुभव देणाऱ्या ‘सालबर्डी’ चित्रपटात मराठीतल्या उत्तम कलाकारांची मांदियाळी आहे. हे कलाकार कोण? हे अजून गुलदस्त्यात आहे.


‘सालबर्डी’ चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश संतोष मोरे यांचे आहे. पटकथा आणि संवाद रोहित शुक्रे यांचे आहेत. गुरु ठाकूर, मुकुंद भालेराव यांनी लिहिलेल्या गीतांना पद्मनाभ गायकवाड यांचे संगीत लाभले आहे. पार्श्वसंगीताची जबाबदारी अमर मोहिले यांनी सांभाळली आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी या गायकांचा स्वरसाज चित्रपटाला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, आशीष पाटील यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते दिपक कुदळे पाटील आहेत. वेशभूषा प्रणिता चिंदगे तर रंगभूषा श्रीनिवास मेनूगे यांची आहे. कलादिग्दर्शन प्रदीप गुरव यांचे आहे.

Comments
Add Comment

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

करण जौहरचा चित्रपट ऑस्कर 2026 मधुन बाहेर;चाहत्यांमध्ये निराशा..

मुंबई :ऑस्कर २०२६, ९८व्या अकॅडमी अवॉर्ड्सच्या नामांकनांची अधिकृत यादी जाहीर झाली असून, भारताकडून अधिकृत प्रवेश

मराठी मनोरंजनाचा समृद्ध खजिना घेऊन 'नाफा स्ट्रीम'ची नॉर्थ अमेरिकेत धडाकेबाज एंट्री!

सॅन होजे (मनोरंजन प्रतिनिधी) : राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ‘देऊळ’ आणि ‘भारतीय’ या गाजलेल्या चित्रपटांचे

फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – या प्रजासत्ताक दिनी पाहा 7 देशभक्तीपर चित्रपट

प्रजासत्ताक दिन विशेष: फरहान अख्तर अभिनीत ‘120 बहादूर’पासून सनी देओलच्या ‘बॉर्डर’पर्यंत – हे सात प्रेरणादायी

सारांश नंतरचा दुसरा चित्रपट; अनुपम खेर यांचा 'तन्वी द ग्रेट' चित्रपट ऑस्करसाठी ठरला पात्र

मुंबई : अनुपम खेर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाला प्रेक्षकवर्गाचा प्रतिसाद मिळाला आहे,

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी