आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यात या अमेरिकन विक्रीचे आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीचे पडसाद नक्की उमटतील यात काही शंका नाही. पण भारतासाठी रात्र वैऱ्याची आहे इतके खरे.
सेल अमेरिका ट्रेडच्या अंतर्गत जागतिक गुंतवणूकदार अमेरिकन संपत्ती काढून घेत आहेत आणि त्यामुळेच अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलॅँडच्या संदर्भात युरोपीय सहयोगी देशांवर टॅरिफ लावण्याची धमकी दिली. २०२६ मध्ये अपेक्षेच्या विपरित शांत भासणाऱ्या जागतिक बाजारांमध्ये अचानक तेजी आली आणि त्याचा परिणाम व्यापक प्रमाणात दिसू लागला. मागील आठवड्यात अमेरिकन शेअर बाजारातील शेअर्सचे भाव कोसळले आणि दोन टक्के बाजार कोसळला. अमेरिकन ट्रेझरी बॉंडच्या किमती कोसळल्या आणि डॉलर प्रमुख वैश्विक मुद्रांच्या तुलनेत कमजोर झाला. याचा संपूर्ण परिणाम अमेरिकन बाजारातील मंदीवर तर झाला आहेच पण जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकन बाजारावर न रहाता इतर सुरक्षित ठिकाणांवर गेले. याचे कारण एकच आहे ते म्हणजे ट्रम्प यांच्या टॅरिफचा दहशतवाद आणि त्यामुळे जगभर पसरलेला भयगंड. रुपया विक्रमी घसरला तर निफ्टी कोसळला. ट्रम्प यांच्या टॅरिफची भीती जगभरात तर आहेच पण खुद्द अमेरिकेतही आहे. कारण अमेरिकेत गुंतवणूकदार तेथील संपत्तीमधून आपला पैसा काढून घेत आहेत. सेल अमेरिका म्हणजे जेव्हा गुंतवणूकदार एकाच वेळी अमेरिकन स्टॉक्स, डॉलर आणि सरकारी रोखे विकतात आणि जे अमेरिकेच्या आर्थिक आणि राजकीय स्थिरतेबद्दल चिंता व्यक्त करते तेव्हा ही परिस्थिती पुन्हा उद्भवली आहे आणि त्यात भर टाकली आहे ती ट्रम्प यांच्या ग्रीनलँडबाबतच्या धोरणामुळे. त्यामुळे अमेरिकन मालमत्तेची किंमत घसरली आणि अमेरिकेचे आर्थिक स्थान कमकुवत होत आहे. याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर आणि जागतिक बाजारांवर होत आहे. सेल अमेरिका केव्हा म्हणतात, तर जेव्हा अमेरिकन गुंतवणूकदार अमेरिकन डॉलर, रोखे आणि ट्रेझरी बाँड एकाच वेळी विकतात तेव्हा. अमेरिकेत राजकीय अस्थिरता आणि व्यापार युद्धे यामुळे सेल अमेरिका ट्रेड सुरू होतो. याला कारण आहे, ते ट्रम्प यांचे ग्रीनलँड टॅरिफचे वादग्रस्त धोरण आणि गुंतवणूकदार अमेरिकेला सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानणे थांबवतात.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी टॅरिफ लावण्याची धमकी दिल्याने हा ट्रेड पुन्हा सुरू झाला आणि काही प्रमाणात भारताला याचा फटका बसणार. या ताणामुळे बाजारात अस्थिरता निर्माण झाली. याचे परिणाम अमेरिकन मालमत्तेची घसरण होते आणि डॉलरचे मूल्य कमी होते. एके काळी अमेरिका हा संपन्न देश होता आणि अमेरिकेला सर्व जगावर राज्य करता यायचे. आज तशी परिस्थिती राहिलेली नाही आणि अमेरिका आज संकटग्रस्त झाला. त्यात अमेरिकेच्या काही निर्णयांचा वाटा जसा आहे तसेच ट्रम्प यांच्या हेकेखोरपणा आणि टॅरिफचे अस्त्र उगारण्याच्या आवाजवी हेकेखोरपणाचाही वाटा आहे. अमेरिकेच्या या नादानीमुळे भारतावरही विपरित परिणाम होत आहे आणि भारताच्या चहा, तांदूळ यांच्या निर्यातीतही आव्हानाना सामोरे जावे लागते. सेल अमेरिका म्हणजे एकप्रकारे पॅनिक सेलिंग आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले असल्यास नवल नाही. एका दिवसात १.४ ट्रिलियन साफ झाले. म्हणजे, गुंतवणूकदारांची संपत्ती १.४ ट्रिलियन डॉलरने खाक झाली. ट्रम्प यांच्या या टॅरिफसंदर्भात केलेल्या दादागिरीमुळे वॉल स्ट्रीटवर दबाव दिसला आणि अमेरिकन फ्युचर्स कोसळले. ग्रीनलँडवरून अमेरिका आणि युरोप यांतील तणाव वाढला. याचा परिणाम म्हणून ट्रम्प यांनी आठ नाटो देशांवर मोठा टॅरिफ लावण्याची धमकी दिली. अमेरिकन शेअर बाजारात तर घसरण लागली आणि गुंतवणूकदार आता सुरक्षित पर्यायांकडे वळल्याने बाजारातील भावना आणखी कमकुवत झाल्या. अमेरिकन बाजारात उफाळलेल्या वणव्यात गुंतवणूकदारांची १.४ ट्रिलियन डॉलरची संपत्ती खाक झाली. अमेरिकन बाजारात एवढे आकांडतांडव सुरू असताना इतर बाजारांवर त्याचा परिणाम होणे अपरिहार्य होते. अमेरिका आणि युरोपात सध्या प्रचंड तणाव आहे आणि त्याचे पडसाद नफा वसुलीच्या बाबतीत गुंतवणूकदारांनी तडाखा लावला. अमेरिकेतील व्यापार कोंडीमुळे भारतीय निर्यातीसाठी आगामी काही काळ अवघड जाणार असल्याचे भाकीत वर्तवण्यात आले असले तरीही त्याचे वास्तव हे आहे, की भारतीय निर्यातीत अडथळे येणार आहे. सोने आणि चांदी यांचे दर तर प्रचंड वाढलेत. सोन्या आणि चांदीमध्ये गुंतवणूक वाढली. ग्रीनलँड टॅरिफमुळे सेफ हेवन मालमत्तांची मागणी वाढली. एका वर्षात रुपया ६.५ टक्क्यांनी कोसळला आणि २१ जानेवारी २०२५ ला जो दर ८६.२१ होता त्याचा दर आता ९०.९७ झाला. रुपया सातत्याने कमजोर दिसत आहे आणि भांडवली बाजारातून रक्कम काढली जात आहे. भारतासाठी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे पण भारताने यामुळे घाबरू न जाता ट्रम्प यांना तसेच उत्तर दिले पाहिजे. भारताने इतर युरोपीय बाजारपेठांत भांडवली गुंतवणूक करणे आवश्यक आहे. आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यात या अमेरिकन विक्रीचे आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीचे पडसाद नक्की उमटतील यात काही शंका नाही. पण भारतासाठी रात्र वैऱ्याची आहे इतकेच खरे. ट्रम्प यानी टॅरिफच्या धमक्यामुळे आणि भू-राजकीय तणावामुळे गुंतवणूकदारांनी आपले लक्ष अन्यत्र वळवले आणि त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात भरमसाट वाढ झाली. या परिस्थितीशी भारत सामना करू शकेल तो पर्यायी सोने-चांदीच्या व्यापारातील आपला वाटा कमी करून. भारतीय शेअर बाजार हा धक्का सहन करण्याच्या अवस्थेत नाही पण त्याने त्यातून मार्ग शोधला पाहिजे. सोने दीड लाखांवर गेले, तर चांदी ३.२३ लाखांवर. यामुळे गुंतवणूकदार हतबल झालेत, तर बाजार अवाक् झाले आहे.






