Friday, January 23, 2026

राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

राज्यपालांविरोधात ‘सर्वोच्च’मध्ये जाण्याची सिद्धरामय्या यांची तयारी

कर्नाटकातही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष चिघळला

नवी दिल्ली  : कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणातील केवळ दोन ओळी वाचल्या आणि ते सभागृहातून निघून गेले. यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्या नाराज झाले असून त्यांनी राज्यपालांच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. राज्यपालांनी भाषणाच्या सुरुवातीला सर्व सदस्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी हिंदीत दोन ओळी वाचल्या. ‘माझे सरकार राज्याच्या आर्थिक, सामाजिक व भौतिक विकासाचा वेग दुप्पट करण्यास कटिबद्ध आहे. जय हिंद, जय कर्नाटक’, इतके वाचून राज्यपाल यांनी सभात्याग केला. यानंतर काँग्रेस सदस्यांनी नाराजी व्यक्त करत राज्यपालांविरोधात घोषणाबाजी केली. तामिळनाडू नंतर कर्नाटक राज्याचाही राज्यपालांशी असलेला संघर्ष उघड झाला आहे. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सभागृहात भाषणाला मंजुरी देण्याआधी ११ उतारे हटविण्यास सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या व मंत्रिमंडळाने त्यास नकार दिला होता.

Comments
Add Comment