Friday, January 23, 2026

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणाच्या चौकशीच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाला डिजिटल अटक

मुंबई :एका ७५ वर्षीय निवृत्त महापालिका अधिकाऱ्याची सायबर गुन्हेगारांनी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या गुन्हेगारांनी एटीएस आणि एनआयएचे अधिकारी असल्याचे भासवून, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचे नाव समोर आल्याचा दावा करत, चौकशीच्या बहाण्याने "डिजिटल अटक" केली होती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंधेरी (पूर्व) येथील रहिवासी असलेल्या पीडित व्यक्तीने सोमवारी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधल्यानंतर हा प्रकार उजेडात आला. गेल्या वर्षी १० नोव्हेंबर रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याबाहेर स्फोटकांनी भरलेल्या वाहनात स्फोट झाला होता, ज्यात १२ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात मुंबई महानगरपालिकेचे निवृत्त अधिकारी असलेल्या पीडित व्यक्तीला ११ डिसेंबर रोजी अज्ञात व्यक्तींकडून फोन आला. आपण दिल्ली दहशतवादविरोधी विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून त्याना धमकी दिली की, दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात त्याचे नाव समोर आले आहे आणि त्याची गुप्तपणे चौकशी करणे आवश्यक आहे. त्यानंतर फोन करणाऱ्याने पीडित व्यक्तीला सिग्नल ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले, जिथे त्याला व्हिडिओ कॉल आला. या कॉलदरम्यान, एका गुन्हेगाराने एनआयएचे सदानंद दाते असल्याचे भासवले. त्यानंतर फोन करणाऱ्याने पीडित व्यक्तीला सांगितले की, त्याच्या मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या बँक खात्यात मनी लाँड्रिंगद्वारे ७ कोटी रुपये आले आहेत आणि त्याला या प्रकरणात अटक केली जाईल, अशी धमकी दिली. या प्रकरणाचे गांभीर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेशी असलेला कथित संबंध लक्षात घेऊन, फोन करणाऱ्याने पीडित व्यक्तीला या विषयावर कोणाशीही चर्चा न करण्याची सूचना दिली. गुन्हेगारांनी दावा केला की एजन्सीला त्याच्या गुंतवणुकी आणि ठेवी कायदेशीर स्त्रोतांकडून आहेत की नाही याची पडताळणी करणे आवश्यक आहे आणि पीडित व्यक्तीला पडताळणीसाठी त्याचे पैसे काही विशिष्ट बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यास सांगितले. त्यानुसार, पीडित व्यक्तीने १६.५ लाख रुपये जमा केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा