विरोधकांच्या टीके फडणवीस यांचे उत्तरला
नवी दिल्ली : जगातील राजकीय नेते इथे आहे. जगातील उद्योगांचे नेतृत्व करणारे इथे आहेत. जगातील नवीन शोध या ठिकाणी मांडण्यात आले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता या ठिकाणी दाखवण्यात आल्या आहेत. जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुढे जाणार आहे, हे आपल्याला इथे शिकायला आणि त्यात सहभागी व्हायला देखील मिळते, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
दावोस दौऱ्यावरून होत असलेल्या टीकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मौन सोडले. दावोस येथून संवाद साधत त्यांनी सध्याची भू-राजकीय परिस्थिती, आर्थिक घडामोडी आणि वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममधील सहभाग याबद्दलची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दौऱ्यात झालेल्या करारामुळे महाराष्ट्रात येऊ घातलेल्या गुंतवणुकीबद्दलही
माहिती दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमधून बोलताना म्हणाले की, ‘पहिल्यांदा तर मला हे सांगायचे आहे की, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमधील सहभाग का गरजेचा आहे. आपल्याला कल्पना आहे की, आजच्या भू-राजकीय परिस्थितीत ज्या प्रकारच्या आर्थिक घडामोडी घडत आहेत. त्या घडामोडींमध्ये तुम्हाला जर सुंसगत राहायचे असेल, तर तुम्हाला दावोस वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये
असले पाहिजे.’
‘देशाचे ग्रोथ इंजिन असलेला महाराष्ट्र वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलेच पाहिजे. ती संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. या ठिकाणी दोन गोष्टी असतात. एक आपला सहभाग असतो. ज्यात द्विपक्षीय बैठका होतात. उद्योगपतींसोबत बैठका होतात. वेगवेगळ्या संवादात भाग घेऊन आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते. त्या क्षेत्रातील जे जे नवीन घडत आहोत, त्यात आपण सध्या कुठे आहोत, या गोष्टी आपल्याला सांगता येतात. त्याचबरोबर अनेक गुंतवणुकीचे करारही या ठिकाणी होतात’, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.