रत्नागिरी : दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी ३७ कोटी २७ हजार कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहेत. राज्याच्या विविध कानाकोपऱ्यात ही गुंतवणूक झाली असून कोकणात ३ लाख कोटींचे ११ करार झाले असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे शिष्टमंडळ दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत सहभागी झाले आहेत. पहिल्या दिवशीही मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे करार झाले होते. मागील दोन दिवसांत ३७ लाख २७ हजार ७८७ लाख कोटींचा करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली.
आजपर्यंतच्या इतिहासातील ही सर्वात मोठी गुंतवणूक झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ४३ लाख रोजगार उपलब्ध होणार आहे. एका दिवसात ५१ करार झाले आहे. यामध्ये एमआयडीसीसोबतच एमएमआरडीए, सिडको यांचाही समावेश आहे. एमएमआरडीएमध्ये १९ तर सिडकोसोबत ६ करार झाला आहे. मागील दोन दिवसात८१ करार झाले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकणासाठी ११ करार झाले असून त्यात ३ लाख ८१० कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले आहेत. यात आयटी, डेटा सेंटर्स, ईव्ही ऑटोमोबाईल, जहाज बांधणी, डिफेन्स, डिजिटल इन्फ्रा सारखे उद्योग असणार आहेत.