Friday, January 23, 2026

ओडिशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट बंद

ओडिशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट बंद

ओडिशा राज्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): ओडिशा सरकारने गुरुवारी राज्यात बिडी, सिगारेट, गुटखा, तंबाखू, खैनी व जर्दा यांसह सर्व प्रकारच्या अमली पदार्थांवर संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. केवळ विक्रीवरच नाही, तर पदार्थांचे उत्पादनावर, पॅकेजिंगवर व वितरणावरही बंदी घालण्यात आली आहे. गुटखा, पान मसाला, जर्दा, खैनी यांसारख्या सर्व तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी असेल. फ्लेवर्ड, पॅकेज्ड व सुटी तंबाखू व ज्या खाद्यपदार्थांमध्ये तंबाखू किंवा निकोटीनचा अंश आहे, अशा सर्व उत्पादनांवर ही बंदी लागू असेल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >