Friday, January 23, 2026

कालच्या तुफान घसरणीनंतर आज सोन्याचांदीत सनसनाटी वाढ 'या' कारणांमुळे सोन्याचांदीचे दर १६०००० व ३५०००० जवळ पोहोचले!

कालच्या तुफान घसरणीनंतर आज सोन्याचांदीत सनसनाटी वाढ 'या' कारणांमुळे सोन्याचांदीचे दर १६०००० व ३५०००० जवळ पोहोचले!

मोहित सोमण: परवापर्यंत भूराजकीय अस्थिरतेच्या कारणांमुळे सोन्याचांदीच्या दरात मोठी वाढ होत होती. त्यानंतर चांदीच्या सिल्वर ईटीएफमध्ये जागतिक स्थिरतेमुळे २०% मूल्यांकन कोसळले गेले. सोन्यातही काल मोठी घसरण झाल्याने २०००० रूपयांनी चांदी व सोने स्वस्त झाले. दरम्यान आज पुन्हा एकदा अस्थिरतेत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना भारतीय सराफा बाजारात वाढत्या ईटीएफ गुंतवणूकीत वाढ होत असल्याने व लग्नकार्यांचा मोसम सुरू झाल्याने सोन्याचांदीच्या मागणीत पुन्हा एकदा वाढ होत आहे. विशेषतः पुनः एकदा ट्रम्प यांच्या इराणवरील आक्रमक भूमिकेमुळे गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगली. ट्रम्प यांनी इराणच्या दिशेने जहाजे तैनात केली असल्याचे वक्तव्य केल ज्यामध्ये सोन्याला आज अतिरिक्त महत्व प्राप्त झाले. त्यामुळेच सोने चांदी आज मोठ्या प्रमाणात उसळले. 'गुडरिटर्न्स' या संकेतस्थळावरील उपलब्ध माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ५४० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९५ रूपयांनी, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४०५ रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेट सोन्यासाठी १५९७१, २२ कॅरेट सोन्यासाठी १४६४०, १८ कॅरेट सोन्यासाठी ११९७८ रूपयांवर पोहोचला.

तसेच उपलब्ध माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ५४०० रूपयांनी, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ४९५०, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ४०५० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १५९७१०, २२ कॅरेटसाठी १४६४००, १८ कॅरेटसाठी ४०५० रूपयांवर पोहोचला. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १५९७१, २२ कॅरेटसाठी १४६४०, १८ कॅरेटसाठी ११९७८ रूपयांवर पोहोचला आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील सोन्याच्या निर्देशांकात एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) दुपारपर्यंत ०.९९% वाढ झाली असून दरपातळी १५७८९१ रूपयांवर पोहोचले आहेत.

जागतिक अस्थिरतेचा फायदा सोन्यात सातत्याने होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून रूपया अपवादात्मक स्थिती वगळता मोठ्या प्रमाणात कोसळत आहे. आज डॉलर निर्देशांकात घसरण झाल्याने रूपया काही प्रमाणात डॉलर तुलनेत सुधारला असला तरी गेल्या तीन दिवसात युएस डॉलरमध्ये मोठी वाढ झाली होती. परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतल्याचे सत्र सुरू ठेवल्याने बाजारातील रूपयाचे महत्व कमी झाले होते. गेल्या दोन सत्रात जवळपास १ रूपयाने भारतीय रूपयाने वापसी केली.

दुसरीकडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विविध विधानामुळे नवी गुंतवणूक वाढवण्यापेक्षा गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका पत्करली असून किंबहुना कमोडिटीतील ( सोन्याचांदीच्या) सुरक्षित गुंतवणूकीत वाढ केली ज्याचा परिणाम म्हणून सोने मोठ्या संख्येने उसळत १६००० प्रति ग्रॅम आसपास पोहोचले. जागतिक स्थितीत पाहिल्यास सोने व प्लॅटिनम जगभरात उच्चांकी पातळीवर पोहोचले. उपलब्ध माहितीनुसार, गोल्ड स्पॉट दरात ०.७% वाढ झाल्याने दरपातळी ४९६७.४८ औंस प्रति डॉलरवर पोहोचली होती.

चांदीच्या दरातही तुफान वाढ -

कालच्या २०००० रूपयांच्या घसरणीनंतर सोने ईटीएफ (Exchange Traded Fund ETF) काल २०% घसरण नोंदवली. सातत्याने ग्रीनलँड ताब्यात घेण्याचा युएसच्या आक्रमक पवित्र्यामुळे सोने चांदी सातत्याने वाढत होती. मात्र युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये युरोपियन युनियन व ग्रीनलँडशी चर्चा करण्यासाठी पुढाकार करण्याचे विधान केल्यानंतर बाजाराने नरमाईची भूमिका घेतली होती. आज मात्र पुन्हा एकदा प्राईज करेक्शन झाल्यानंतर इराणवरील ट्रम्प यांच्या भूमिकेमुळे व भारतीय उपखंडात सणासुदीच्या काळात व लग्न समारंभाच्या सिझनमुळे लोकांनी वाढवलेली खरेदी, औद्योगिक उत्पादकता चांदीत असल्याने औद्योगिक क्षेत्रातील चांदीची वाढती मागणी यामुळे चांदीही महागली आहे. युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरात कपातीवरील आरोप प्रत्यारोप यांचाही परिणाम व अंडरकरंट बाजारात सातत्याने दिसतच आहे. त्यामुळे आज चांदीच्या दरातही तुफान वाढ झाली. संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १५ रूपयांनी वाढ झाली त्यामुळे प्रति ग्रॅम दर ३४० व प्रति किलो दर ३४०००० रूपयांवर पोहोचला.

भूराजकीय धोके, कमकुवत अमेरिकन डॉलर आणि सोन्याकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे चांदीच्या किमतींमध्ये वाढ सुरूच राहिली आणि ती २.७६% नी वाढून ३२७,२८९ वर चांदी सुरुवातीच्या कलात स्थिरावली आहे तथापि युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपविरुद्धच्या प्रस्तावित शुल्कवाढीच्या धमक्या मागे घेतल्या आणि ग्रीनलँडबाबत नाटोसोबत एका आराखडा कराराची घोषणा केली जी नरमाईची भूमिका ट्रम्प यांनी घेतली असल्याने ज्यामुळे तात्काळ व्यापार-संबंधित तणाव कमी झाला असला तरी सुरक्षित गुंतवणुकीचे आकर्षण काही प्रमाणात घटले असे तज्ञांचे मत आहे. परिणामी दरवाढीला काहीसा लगाम बसला.अमेरिकेतील मॅक्रोइकॉनॉमिक डेटा मौल्यवान धातूंसाठी अनुकूल असला तरी त्यात संमिश्रता होती असेही तज्ञांनी म्हटले. २०२५ च्या तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेची अर्थव्यवस्था वार्षिक ४.४% च्या मजबूत दराने वाढली असून जी २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीनंतरची सर्वात मोठी वाढ होती. या वाढीला मजबूत ग्राहक खर्च, वाढती निर्यात आणि सरकारी खर्चात वाढ यामुळे चालना मिळाली. दरम्यान, सुरुवातीच्या बेरोजगारीच्या दाव्यांची संख्या किंचित वाढून २००००० झाली,जी अपेक्षेपेक्षा खूपच कमी राहिली आणि कामगार बाजाराची लवचिकता कायम असल्याचे दर्शवते.मूलभूत घटकांच्या दृष्टिकोनातून, जागतिक बँकांनी चांदीबद्दल मध्यम-मुदतीसाठी सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे. त्यामुळे सोने घसरण्याची शक्यता असली तरी सोन्यात वाढ होईल अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सोन्याचे प्रति १० ग्रॅम सरासरी दर ३४०० व प्रति किलो दर ३४०००० रूपयांवर पोहोचले आहेत. तर गेल्या १० दिवसांपासून चांदी ७०००० रुपयांनी वाढली आहे. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात दुपारपर्यंत २.४३% वाढ झाल्याने दरपातळी ३२५२५७ रूपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment