अहमदाबादमध्ये दुर्दैवी घटना; पतीने चुकून झाडली पत्नीवर गोळी अन्....

अहमदाबाद : गुजरातची राजधानी अहमदाबाद येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. परवानाधारक शस्त्र हाताळताना झालेल्या दुर्घटनेत तरुण पत्नीचा मृत्यू झाला, तर त्यानंतर पतीने स्वतः जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. मृत पती हे ज्येष्ठ काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार शक्तीसिंह गोहिल यांचे पुतणे असल्याची माहिती आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, क्लास वन अधिकारी असलेले यशराज सिंह गोहिल आणि त्यांची पत्नी राजेश्वरी हे बुधवारी रात्री एका कार्यक्रमातून घरी परतले होते. दोघांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. घरात आल्यानंतर बेडरूममध्ये असताना यशराज आपली परवानाधारक रिव्हॉल्वर चेक करत असताना यांच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी सुटली. ही गोळी राजेश्वरी यांच्या मानेला लागली आणि त्या गंभीर जखमी झाल्या.


घटनेनंतर घाबरलेल्या यशराज यांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून मदतीची मागणी केली. मात्र, वैद्यकीय पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत राजेश्वरी यांचा मृत्यू झाला होता. आपल्या निष्काळजीपणामुळे आपली पत्नी आपल्याला कायमची सोडून गेली, या विचाराने यशराज कोलमडले.


काही वेळातच घरातील बेडरूममधून पुन्हा गोळीबाराचा आवाज ऐकू आला. कुटुंबीय आणि रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी आत धाव घेतली असता, यशराज हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळून आले. त्यांनी त्याच शस्त्राचा वापर करून स्वतःवर गोळी झाडल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, पोलिसांनी अपघाती मृत्यू आणि आत्महत्येचा गुन्हा नोंदवला आहे.

Comments
Add Comment

‘तो ती आणि फुजी’ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सुपरहिट

पुणे : शिलादित्य बोरा निर्मित आणि मोहित टकळकर दिग्दर्शित मराठी–जापानी चित्रपट ‘तो ती आणि फुजी’चा २४व्या पुणे

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘बीग्सी’ अभिनव, खर्चमुक्त उपक्रम

मुंबई : महिला प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत गृह विभाग तसेच परिवहन विभागाच्या सहकार्याने

शहीदी समागम कार्यक्रमासाठी भव्य लंगरची व्यवस्था

नांदेड : हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त २४ आणि २५ जानेवारी

साईबाबांच्या पालखीच्या प्रवासातील साई भक्तांच्या अढळ श्रद्धेवर आणि भक्तीवर आधारित , 'पालखी' चित्रपटाचा मुहूर्त

मुंबई : श्रद्धा ही केवळ भावना नाही, ती आयुष्याला नवी दिशा देणारी शक्ती आहे. साईबाबांच्या कृपेवर आणि अढळ

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व

बुलढाण्यात एसटी बसचा थरार; ब्रेक निकामी झाल्यावर चालकाने....

बुलढाणा : महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात एसटी बसचा अपघात थोडक्यात टळला. चालकाने प्रसंगावधान राखल्यामुळे