Friday, January 23, 2026

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मध्य रेल्वेद्वारा मुंबई–नागपूर / मडगाव दरम्यान ४ विशेष रेल्वे सेवा

मुंबई  : रेल्वे प्रवासाच्या वाढत्या मागणीचा विचार करता, मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई – नागपूर तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान विशेष रेल्वे सेवा चालविण्यात येणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेत:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – नागपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष – (२ सेवा) गाडी क्रमांक 02139 आणि गाडी क्रमांक 02140 अशा २ सेवा शनिवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून आणि नागपूर येथून त्याच दिवशी उपलब्ध असतील. या विशेष गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे घेतील. तर लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष – (२ सेवा) गाडी क्रमांक 01129 आणि गाडी क्रमांक 01130 विशेष गाडी रविवार, दिनांक २५.०१.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस - मडगाव आणि मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या असतील. या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड येथे थांबतील. आरक्षण : गाडी क्रमांक 02139, 02140 आणि 01129 साठी आरक्षण आज दिनांक २३.०१.२०२६ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच IRCTCच्या संकेतस्थळावर (www.irctc.co.in) खुले होईल. अनरक्षित डब्यांसाठी सामान्य दरात बुकिंग UTS द्वारे करता येईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी कृपया मध्य रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >