Friday, January 23, 2026

मुंबईत मंगळवारपासून पुढील सात दिवस शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबईत मंगळवारपासून पुढील सात दिवस शहर आणि पूर्व उपनगरात १० टक्के पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेस पाणीपुरवठा करणाऱया पिसे येथील ‘न्यूमॅटिक गेट सिस्टिम’च्या वार्षिक परिरक्षणाचे काम हाती घेतले जाणार आहे. हे कामकाज मंगळवार, २७ जानेवारी २०२६ पासून शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत नियोजित आहे. त्यामुळे शहर विभाग आणि पूर्व उपनगरांतील बहुतेक प्रशासकीय विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. या कालावधीत शहर विभाग व पूर्व उपनगरांमध्ये १० टक्के पाणीकपात लागू करण्यात‍ येणार आहे. तसेच ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या भागास मुंबई महानगरपालिकेतर्फे पाणीपुरवठा होतो त्या भागांमध्येही ही १० टक्के पाणीकपात लागू राहणार आहे. तरी परिसरांमधील सर्व नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई मनपा प्रशासनाने केले आहे.

या भागात असेल पाणीकपात

मुंबई शहर :

  1. ‘ए’ विभाग - नेव्हल डॉकयार्ड क्षेत्र
  2. ‘बी’ विभाग - संपूर्ण विभाग
  3. ‘सी’ विभाग - भेंडी बाजार, बोहरी मोहल्ला, घोगरी मोहल्ला क्षेत्र
  4. ‘ई’ विभाग - पूर्ण विभाग
  5. ‘एफ दक्षिण’ विभाग - संपूर्ण विभाग
  6. ‘एफ उत्तर’ विभाग - संपूर्ण विभाग

पूर्व उपनगरे :

  1. ‘टी’ विभाग - मुलुंड (पूर्व) आणि (पश्चिम) क्षेत्र
  2. ‘एस’ विभाग - भांडुप, नाहूर, कांजूरमार्ग आणि विक्रोळी (पूर्व) क्षेत्र
  3. ‘एन’ विभाग - विक्रोळी, घाटकोपर (पूर्व), घाटकोपर
  4. ‘एल’ विभाग - कुर्ला (पूर्व) क्षेत्र
  5. ‘एम पूर्व’ विभाग – संपूर्ण विभाग
  6. ‘एम पश्चिम’ विभाग – संपूर्ण विभाग
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >