प्रतिनिधी: आठवे वेतन आयोगाबात आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट केंद्राकडून मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अपेक्षेपेक्षाही अधिक वाढ वेतनात होऊ शकते असे प्रस्ताव सांगतो. नव्या माहितीनुसार, वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांनी नवा आयोगाचा अहवाल स्विकारला असताना यावर लवकरच निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे कर्मचारी अ, ब, क, ड अशा श्रेणीसाठी विविध वेतन फेरबदल प्रस्तावित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ड दर्जाच्या कर्मचाऱ्यांसाठी १८००० वरून ३८७०० वर हा पगार वाढू शकतो असे सांगण्यात येत आहे. तर स्तर १० म्हणजेच अ दराच्या अधिकाऱ्यांसाठी ५६१०० वरून ही वाढ १२०६१५ रूपयांवर होऊ शकते तसेच सर्वोच्च वरिष्ठ दर्जा (Senior Most Level A) या कर्मचाऱ्यांसाठी ही वाढ २५०००० वरून ५३७५०० रूपयांपर्यंत प्रस्तावित आहे.
उपलब्ध माहितीनुसार, ८वा वेतन आयोग: फिटमेंट घटकांवर आधारित अंदाजित वेतनवाढ पुढीलप्रमाणे -
फिटमेंट घटक २.१५: जर आयोगाने २.१५ फिटमेंट घटक मंजूर करण्याचा निर्णय घेतला, तर वेतनामध्ये लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांसाठी, ज्यात सर्व एंट्री-लेव्हल गट डी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, १८,००० रुपयांचे मूळ वेतन वाढून ३८,७०० रुपये होण्याची शक्यता आहे म्हणजेच २०,७०० रुपयांची वाढ अपेक्षित आहे.
लेव्हल १० साठी, जी गट अ अधिकाऱ्यांसाठी सुरुवातीची श्रेणी आहे, ५६१०० रुपयांचे मूळ वेतन वाढून १२०६१५ रुपये होऊ शकते असे म्हटले जात आहे. सध्या जी ६४५१५ रुपयांची वाढ आहे.
त्यानंतर सर्वोच्च अथवा सर्वात वरिष्ठ लेव्हल १८ साठी, २५०००० रुपयांचे मूळ वेतन वाढून ५३७५०० रुपये होऊ शकते, जी २८७५०० रुपयांची वाढ सांगितली जात आहे.
फिटमेंट घटक २.५७: ७व्या वेतन आयोगाप्रमाणेच गुणाकार (Multiplication) घटक वापरल्यास, लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन १८००० रुपयांवरून ४६२६० रुपये होण्याची शक्यता आहे जी एकूण २८२६० रुपयांची वाढ अपेक्षित असेल. लेव्हल १० च्या अधिकाऱ्यांचे वेतन ५६१०० रुपयांवरून १४४१७७ रुपये होऊ शकते म्हणजेच ८८,०७७ रुपयांची वाढ असेल.
लेव्हल १८ साठी, वेतनातील वाढ २५०००० रुपयांवरून ६४२५०० रुपये होऊ शकते जी ३९२५०० रुपयांची वाढ असेल
फिटमेंट घटक २.८६: त्यामुळे २.८६ फिटमेंट घटकामुळे वेतनात आणखी मोठी वाढ होणार आहे. लेव्हल १ च्या कर्मचाऱ्यांचे वेतन १८००० रुपयांवरून ५१४८० रुपये होऊ शकते म्हणजेच एकूण वेतनवाढ ३३,४८० रुपयांनी अपेक्षित आहे.
लेव्हल १० च्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात ५६१०० रुपयांवरून १६०४४६ रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते, म्हणजेच १०४३४६ रुपयांची वाढ ही असू शकते.
लेव्हल १८ च्या अधिकाऱ्यांच्या मूळ वेतनात २५०००० रुपयांवरून ७१५००० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते ज्यामुळे ४,६५,००० रुपयांची वाढ होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.
आता फिटमेंट फॅक्टर काय असतो?
फिटमेंट फॅक्टर हा एक महागाई मोजण्याचा एक महत्वाचा गुणक घटक असतो. सध्या असलेल्या महागाईचा सांगोपांग अभ्यास करून वित्त आयोग यावर वेळोवेळी निर्णय घेत असतो. ज्याद्वारे एखाद्याच्या मूळ वेतनात (Basic) मध्ये बदल केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, जेव्हा सातव्या वेतन आयोगासाठी फिटमेंट फॅक्टर २.५७ होता तेव्हा सहाव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्याचे ७४४० रुपये मूळ वेतन १८००० रुपयांपर्यंत वाढू शकले फिटमेंट फॅक्टर हा पगारवाढीचा दर निश्चित करणारा सर्वात महत्त्वाचा घटक आहे.
उपलब्ध माहितीनुसार, एफएनपीओचे सरचिटणीस आणि एनसीजेसीएमचे सदस्य शिवाजी वासिरेड्डी यांनी नॅशनल कौन्सिलला (JCM) पाठविलेल्या ६० पानांच्या पत्रात हा प्रस्ताव दिल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. या पत्रात केवळ फिटमेंट फॅक्टरच नाही तर बदलत्या जीवनशैली बदलती महागाई व इतर गुणक घट यांचा विचार करून नवीन वेतन रचना, वेतन मॅट्रिक्स प्रणाली, वार्षिक वेतनवाढ, भत्ते, पदोन्नती आणि इतर सेवा शर्तींशी संबंधित सूचना देखील आहेत असे सांगितले गेले. वासिरेड्डी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, मागील वेतन आयोगात सर्व स्तरांवर समान फिटमेंट फॅक्टर लागू केल्यामुळे वेतन संरचनेत असमतोल निर्माण झाला होता.
या कारणास्तव यंदा एफएनपीओने स्तरानुसार मल्टी-फिटमेंट फॅक्टर मॉडेल सुचविले आहे. तज्ञांच्या मते ते उपयुक्त असेल ते एककल्ली नसून प्रत्येक स्तरावर अवलंबून असेल. एफएनपीओचा हा प्रस्ताव अक्रोयड फॉर्म्युलावर आधारित आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, चार जणांच्या कुटुंबाच्या किमान गरजा लक्षात घेऊन वेतन निश्चित केले जाते. महागाई व एकूणच राहणीमानाचा बदलता व वाढता खर्च आणि प्रत्यक्ष वेतनात झालेली घट लक्षात घेता खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांसाठी काहीसा दिलासा मिळेल असे संघटनेचे म्हणणे आहे. अर्थातच या सगळ्या प्रक्रियेला अंतिम मंजुरी अद्याप दिली गेली नाही.






