पतितपावन नाम ऐकुनी पतितपावन नाम ऐकुनी आलो मी द्वारा । पतितपावन नव्हेसी म्हणुनी जातो माघारा ।। घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा असशी उदार । काय धरुनी देवा तुझे कृपणाचे द्वार ॥ सोडी ब्रीद देवा आता नव्हेसी अभिमानी । पतितपावन नाम तुझे ठेवियले कोणी ॥ झेंगट घेऊनि हाती दवंडी पिटीन तिहीं लोकी। पतितपावन देवा परी तू मोठा धातकी ।। नामा म्हणे देवा तुझे न लगे मज काही । प्रेम असो दे चित्री म्हणुनी लागतनों पायी ॥
- डॉ. देवीदास पोटे
संत नामदेव हे विठ्ठलाचे सर्वात जवळचे भक्त. विठुरायाचे प्रेमभंडारी त्यांच्या निरागस भक्तीने प्रसन्न होऊन देवाने नैवेद्य सेवन केला, अशी आख्यायिका आहे. याच उत्कट मक्तीच्या आंतरिक उर्मीने त देवाशी संवाद करतात.
हा अभंग त्यांच्या आरंभीच्या संघर्षमय काळातील आहे. संत नामदेव आपल्या मनातील अस्वस्थपणा विठ्ठलाला सांगत आहेत. ते म्हणतात, हे देवा, दू दीनांचा वाली आहेत, गरिबांचा उद्धारकर्ता आहेस. "पतितपावन "आहेस, ही कीर्ती ऐकून मी तुझ्या दारी आलो आहे. पण तू "पतितपावन'' नाहीस असे मला जाणवले. म्हणून निराश होऊन मी परत जात आहे. तू दिल्या घेतल्याचा स्वामी आहेस. तू अतिशय कृपण वा कंजूष आहेत. आपला अभिमान सोडून तू आपल्या ब्रीदाला जागावेस. तुझे वर्तन पाहून तुझे "पतितपावन'' हे नाव कुणी ठेवले, असा प्रश्न पडतो. मी हातात वाद्य घेवू्न तिन्ही लोकांत दवंडी पिटीन की तू मोठा विश्वासघातकी आहेस. मला तुझे वागणे काही कळत नाही. हे देवा, माझ्यावर तुझे प्रेम अखंडितपणे राहावे. म्हणून तुझ्या पायी मी लीन झालो आहे.
जिथं प्रेम आहे तिथंच रागावण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे अधिकाराचे प्रेम नव्हे तर प्रेमाचा अधिकार आहे. देवाशी संवाद करण्याचा, प्रसंगी त्याला जाब विचारण्याचा अधिकार संतांनी मिळवला होता. "देवाशी मांडण म्हणजे आपल्या अपूर्णतेकडून पूर्णवाकाडे होत जाणारा आंतरिक प्रवास. आंतरिक उन्नयनाकडे होते असलेली वाटचाल.
સમ देव भक्ताचा पाठीराखा, उद्धारकर्ता आहे. त्याचा अनेक नावांपैकी "पतितपावन" हे असेच एक नाव. देवाशी संवाद करीत संत नामदेवांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. देवाला दूषणे देत, धमकी देत शेवटी मात्र देवाने प्रेमाची सावली आपल्यावर धरावी, अशी विनवणी केली आहे.
भक्तीची ताकद काय असते याचा प्रत्यय या अभंगातून येतो. भक्तीचे हे उत्कट चित्र आपल्या आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करते.





