महानगरपालिकेच्‍या शालेय विद्यार्थ्यांना नौकानयन क्रीडा प्रशिक्षण

मुंबई( विशेष प्रतिनिधी) : जपानमधील नागोया येथे होणाऱ्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतातील नौकानयनपटू जोरदार तयारी करत आहेत. या अंतर्गत ‘सेल इंडिया २०२६’ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणी - भाग २ या महत्त्वपूर्ण स्पर्धेचा दिमाखदार प्रारंभ स्वराज्यभूमी (गिरगाव चौपाटी) येथे झाला. स्पर्धेच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या ‘बीएमसी – आर्मी सेलिंग स्कूल’ मधील शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना साहसी नौकानयन क्रीडेची प्रत्यक्ष ओळख मिळत असून, भविष्यातील गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.


‘सेल इंडिया २०२६’ आणि आशियाई क्रीडा स्पर्धा निवड चाचणी - भाग २ या महत्त्वपूर्ण स्पर्धेसाठी देशभरातील १८ क्लब व संस्थांमधील सुमारे १५० नामांकित नौकानयनपटू सहभागी झाले आहेत. विविध ऑलिम्पिक व आंतरराष्ट्रीय प्रकारांमध्ये या स्पर्धा होत आहेत. विविध चाचण्यांद्वारे २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.



स्‍वराज्‍यभूमी येथे या स्‍पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र–गुजरात क्षेत्र मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ मेजर जनरल सलील सेठ, उप आयुक्त (विशेष) चंदा जाधव, महानगरपालिका उप आयुक्‍त (शिक्षण) प्राची जांभेकर, ‘डी’ विभागाचे सहायक आयुक्त मनीष वळंजू, स्वराज्यभूमी संदर्भातील उच्चस्तरीय समितीच्या सदस्या इंद्राणी मलकानी यावेळी उपस्थित होते. क्रीडावृत्ती, शिस्त आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल करण्याच्या उद्दिष्टावर भर द्यावा, असे आवाहन सलील सेठ यांनी केले. तसेच, या निवड चाचण्या भारतीय नौकानयनाच्या इतिहासात महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचेदेखील नमूद केले.


महानगरपालिका उप आयुक्त (शिक्षण) प्राची जांभेकर यांनी सांगितले की, ‘सेल इंडिया २०२६’ या स्पर्धेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे तळागाळातील क्रीडा विकासावर देण्यात येणारा विशेष भर होय. भारतीय लष्कर व मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बीएमसी – आर्मी सेलिंग स्कूल’च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना नौकानयनाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे मुंबईतील विद्यार्थ्यांना साहसी नौकानयन क्रीडेची प्रत्यक्ष ओळख मिळत असून, भविष्यातील सक्षम व गुणवत्तापूर्ण खेळाडू घडविण्यास निश्चितच चालना मिळणार आहे.

Comments
Add Comment

महालक्ष्‍मी येथील उड्डाणपुलाचे काम ५५ टक्के पूर्ण

अतिरिक्‍त आयुक्‍त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांच्‍याकडून स्‍थळ पाहणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महालक्ष्‍मी

महापौरपदासाठी भाजपमधील केरकर,शिरवडकर,कोळी, सातम, गंभीर, तावडे यांच्या नावाची चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग करता आरक्षित झाला आहे. मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेना

मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचा एकच गट?

स्वीकृत नगरसेवकांसह समित्यांमधील बदलणार समिकरणे मुंबई : मुंबई महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीमध्ये

राज्यातील 'त्रिभाषा सूत्रा'साठी समितीला मुदतवाढ

मुंबई: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने राज्यातील शाळांमध्ये 'त्रिभाषा धोरण' निश्चित करण्यासाठी

प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत -शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई - भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या 26 जानेवारी रोजी राज्यातील सर्व माध्यमाच्या, सर्व

दावोसमध्ये महाराष्ट्राने केले तब्बल ३० लाख कोटींचे गुंतवणूक करार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; १८ देशांमधून राज्यात मोठी गुंतवणूक येणार मुंबई : स्वित्झर्लंडमधील