Thursday, January 22, 2026

फार्मा कंपनी डॉ रेड्डीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर शेअर इंट्राडे ६% उसळला

फार्मा कंपनी डॉ रेड्डीज कंपनीचा तिमाही निकाल जाहीर शेअर इंट्राडे ६% उसळला

मोहित सोमण: डॉ रेड्डीज लॅब्स लिमिटेडने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात (Net Profit) इयर ऑन इयर बेसिसवर १७% घसरण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १४०४ कोटी तुलनेत या डिसेंबरमध्ये नफा ११९० कोटींवर पोहोचला आहे. मात्र कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर ४.४% वाढ झाली आहे. एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात (Revenues) डिसेंबर महिन्यात ४९०५ कोटीवरून ४६८१ कोटींवर वाढ झाली आहे. कंपनीच्या करोत्तर नफ्यात (PAT) इयर ऑन इयर बेसिसवर इयर ऑन इयर बेसिसवर १४% घसरण झाली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या ईबीटा (करपूर्व कमाईत EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर २२९८ कोटीवरुन २०४९ कोटींवर घसरण झाली आहे. तर कंपनीच्या ईपीएस (Earning per share EPS) इयर ऑन इयर बेसिसवर १४% वाढ नोंदवली गेली आहे.

यासह उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या आरओसीई (Return on Capital Employed) इयर ऑन इयर बेसिसवर २७.८% वरून २०.४% घसरण झाली. तर कंपनीच्या माहितीनुसार, भांडवली खर्चात (Capital Expenditures Capex) इयर ऑन इयर बेसिसवर ७०९ कोटीवरुन ६६९ कोटींवर घसरण झाली आहे. बीटा EBITDA मार्जिनमध्ये इयर ऑन इयर बेसिसवर २७.५% वरून २३.५% वर घसरण झाली आहे.

यावेळी कंपनीने आपली अपडेट देताना हेपेटायटीस-ई विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी हेव्हॅक्सिन® ही एक नवीन, रिकॉम्बिनंट लस लाँच केली.ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून विपणन अधिकृती (मार्केटिंग ऑथोरायझेशन) प्राप्त केले आणि सेमाग्लुटाइड इंजेक्शनसाठी स्थानिक उत्पादन परवाने मिळवले असे म्हटले. याशिवाय प्रमुख उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये एफ्टिलागिमोड अल्फा या नवीन इम्युनोथेरपी ऑन्कोलॉजी औषधाच्या व्यापारीकरणासाठी इम्युटेपसोबत धोरणात्मक सहयोग असल्याचेही कंपनीने यावेळी स्पष्ट केले.

नव्या उत्पादन लाँचबाबत भारतात हेपेटायटीस-ई विषाणू संसर्गाच्या प्रतिबंधासाठी हेव्हॅक्सिन ही एक नवीन, रिकॉम्बिनंट लस लाँच केली असून अधिग्रहित NRT व्यवसायाच्या ८५% भागाचे मूल्याच्या दृष्टीने एकत्रीकरण (Consolidation) पूर्ण केले असे कंपनीने स्पष्ट केले. यासह नियामक मंडळ (DCGI) कडून भारतात सेमाग्लुटाइड इंजेक्शनसाठी मार्केटिंग परवाना प्राप्त केला असल्याचे म्हटले आहे. आणखी दिलेल्या माहितीत डिसेंबर २५ मध्ये अमेरिकेसाठी अबॅटासेप्ट बायोसिमिलर (IV) साठी BLA दाखल केला असे म्हटले आहे व डेनोसुमाब बायोसिमिलरसाठी युरोपियन कमिशन (EC) आणि MHRA, यूकेची मंजुरी मिळाली. डिसेंबर २५ मध्ये जर्मनीमध्ये लाँच केले असे कंपनीने आपल्या घोषणा पत्रात स्पष्ट केले आहे.

हैद्राबाद येथे असलेल्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड ही एक प्रमुख भारतीय बहुराष्ट्रीय (MNC) फार्मा अथवा औषध कंपनी आहे. मुख्यालय हैदराबाद येथे आहे. ही कंपनी जागतिक स्तरावर परवडणारी औषधे पुरवण्यासाठी ओळखली जाते. जेनेरिक, एपीआय, बायोसिमिलर आणि ओटीसी उत्पादनांवर लक्ष केंद्रित करते ज्याच्या प्रमुख बाजारपेठा अमेरिका,भारत, रशिया/सीआयएस आणि युरोप येथे आहेत. सकाळच्या सत्रात तिमाहीतील निकालानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये ६% नवी वाढ इंट्राडे उच्चांकावर पोहोचली. सकाळी १०.५८ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ५.३३% वाढ झाल्याने शेअर १२१८.९० रूपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >