कटरा : माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी श्राईन बोर्डाने एक मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर मंदिराची अत्यंत पवित्र आणि प्राचीन गुहा (Ancient Cave) भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, आता भाविकांना केवळ दिवसाच नव्हे, तर रात्रीच्या वेळीही या सुवर्णमयी गुहेतून मातेचे दर्शन घेता येणार आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, मकर संक्रांतीच्या विशेष पूजेनंतर सोन्याने मढवलेल्या या प्राचीन गुहेचे दरवाजे उघडण्यात आले. गेल्या मंगळवारी रात्री १०:३० ते १२:३० या वेळेत भाविकांनी या पवित्र गुहेतून दर्शन घेतले. डोंगराच्या नैसर्गिक रचनेतून तयार झालेली ही प्राचीन गुहा अत्यंत पवित्र मानली जाते आणि ती वर्षातून काही मोजक्याच काळासाठी भाविकांसाठी खुली केली जाते.
मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी मुंबई महानगरपालिका (BMC) आता पुन्हा एकदा महिला राजवटीसाठी सज्ज झाली आहे. मंत्रालयात पार ...
दर्शनासाठी नवीन वेळापत्रक जाहीर
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, श्राईन बोर्डाने दर्शनासाठी दोन विशेष वेळा निश्चित केल्या आहेत. भाविकांना आता सकाळी १०:१५ ते दुपारी १२:०० वाजेपर्यंत दर्शन मिळणार आहे तर रात्रीची वेळ १०:३० ते रात्री १२:३० वाजेपर्यंत असणार आहे. या नियोजित वेळेमुळे रात्रीच्या वेळी शांततेत आणि भक्तीमय वातावरणात दर्शन घेणे भक्तांना शक्य होणार आहे.
दोन दिवसांत ३१ हजारांहून अधिक जणांनी घेतले दर्शन
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या दोन दिवसांत भाविकांचा ओघ सातत्याने वाढत आहे. २० जानेवारीला सुमारे १८,२०० भाविकांनी मातेचे दर्शन घेतलं. २१ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंतच १३,००० हुन अधिक भक्तांनी हजेरी लावली होती. थंडीचा कडाका असूनही भक्तांच्या उत्साहात कोणतीही कमतरता दिसून येत नाहीये, ज्यामुळे कटरा ते भवन या मार्गावर भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. एकाच वेळी हजारो भक्त भवन परिसरात पोहोचत असल्याने दर्शनाची प्रतीक्षा वेळ (Waiting Time) वाढू लागली होती. त्यावर उपाय म्हणून श्राईन बोर्डाने रात्रीचे दर्शन सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. रात्री १०:३० ते १२:३० या वेळेत पवित्र प्राचीन गुहेचे दरवाजे उघडले जात आहेत. यामुळे दिवसा होणारी गर्दी विभागली जाऊन रात्रीच्या वेळीही शांततेत दर्शन घेणे शक्य होत आहे. अधिकाधिक भक्तांना पवित्र गुहेतून दर्शन घेता यावे, यासाठी सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे.
वर्षातून दोनदा उघडते गुफा
माँ वैष्णो देवीची पवित्र गुहा वर्षातून २ महिन्यासाठी उघडले जाते. दरवर्षी सर्वसाधारण गुहा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात उघडली जाते. कारण यावेळी मंदिरात भाविकांची गर्दी कमी असते. रोज सुमारे २० हजार श्रद्धाळू दर्शनासाठी माँ वैष्णोदेवीच्या दर्शनाला पोहचतात.
ऑनलाईन करा ( यज्ञ ) हवन
नोव्हेंबर २०२५ पासून भक्तांच्या सुविधेसाठी श्री माता वैष्णो देवी श्राईन बोर्डाने गर्भगृहात हवन करण्याची नविन सुविधा सुरु केली होती. ज्याअंतर्गत श्रद्धाळू आता ऑनलाईन आणि ऑफलाईन फीवरुन हवन ( यज्ञ ) करु शकतात. या हवनची फी प्रति श्रद्धाळू ३१०० आणि दोन श्रद्धाळूसाठी ५१०० रुपये ठेवण्यात आली आहे.