Thursday, January 22, 2026

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

नागपुरात किवींचा धुव्वा उडवत भारताचा दमदार विजय

अभिषेक शर्मा, रिंकू सिंगच्या वादळी खेळीने मालिकेत १-० ने आघाडी

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अभिषेक शर्माने सुरूवातीला आणि शेवटी रिंकू सिंगने दमदार फलंदाजी करून २३८ धावांचा डोंगर उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. या धावांचा पाठलाग करताना ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमन यांनी पूर्ण जोर लावला. पण शेवटी भारतीय संघाने हा सामना ४८ धावांनी जिंकून मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला सुरूवातीलाच मोठा धक्का बसला. डेव्हॉन कॉन्वे शून्यावर माघारी परतला. त्यानंतर रचिन रवींद्रनेही १ धाव करून पॅव्हेलियनची वाट धरली. सलामीला आलेल्या टीम रॉबिन्सनने १५ चेंडूत २१ धावा करून संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण तो देखील बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर ग्लेन फिलिप्स आणि मार्क चॅपमनने तुफान फटकेबाजी करून न्यूझीलंडला सामन्यात पुनरागमन करून दिलं. ग्लेन फिलिप्सने ४० चेंडूत ७८ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ६ षटकार खेचले. तर चॅपमनने २४ चेंडूत ३९ धावा केल्या. ही जोडी मैदानावर होती, तोपर्यंत न्यूझीलंडचा संघ सामन्यात टिकून होता, पण ही जोडी फुटल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी सामन्यावरील पकड मजबूत केली.

भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर पहिला टी२० सामना झाला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी धावसंख्या उभारली. तसेच या सामन्यात तीन मोठे विक्रमही झाले आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. त्यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजीला उतरला. भारताने अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांच्या आक्रमणामुळे २० षटकात ७ बाद २३७ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध टी२० सामन्यात भारताने उभारलेली ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली. न्यूझीलंडविरुद्धची एकूण टी२०मधील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी धावसंख्या ठरली. भारताने यापूर्वी २०२३ मध्ये अहमदाबादला झालेल्या टी२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ४ बाद २३४ धावा केल्या होत्या. याशिवाय नागपूरमध्ये टी२० सामन्यात केवळ दुसऱ्यांदाच २०० धावांचा टप्पा पार झाला आहे. यापूर्वी श्रीलंकेने २००९ मध्ये भारताविरुद्ध ५ बाद २१५ धावा केल्या होत्या.

न्यूझीलंडविरुद्ध टी२० मधील सर्वोच्च धावसंख्या

२४५/५ - ऑस्ट्रेलिया, ऑकलंड, २०१८

२४१/३ - इंग्लंड, नेपियर, २०१९

२३८/७ - भारत, नागपूर, २०१९

२३६/४ - इंग्लंड, ख्राईस्टचर्च, २०२५

२३४/४ - भारत, अहमदाबाद, २०२३

सर्वाधिक वेळा २०० धावा : भारताने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये डावात २०० हून अधिक धावा करण्याची ही ४४ वी वेळ आहे. त्यामुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिकवेळा डावात २०० धावा पार करणारा संघ आहे. या यादीत भारताच्या आसपासही कोणी नाही. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका आहे. दक्षिण आफ्रिकेने २७ वेळा टी२० मध्ये २०० धावा पार केल्या आहेत.

अभिषेक शर्माची वादळी खेळी : दरम्यान, या सामन्यात संजू सॅमसन (१०) आणि इशान किशन (८) लवकर बाद झाले. पण अभिषेक शर्माने तिसऱ्या विकेटसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत ९९ धावांची मोठी भागीदारी केली. सूर्यकुमार ३२ धावांवर बाद झाला. हार्दिक पंड्याही २५ धावांवर परतला. मात्र अभिषेकने ३५ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८४ धावांची आक्रमक खेळी केली. तसेच रिंकू सिंगनेही २० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ४४ धावांची खेळी केली.

Comments
Add Comment