मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार तेजी सुरु होती. दररोज सोने आणि चांदीचे दर नवे उच्चांक गाठत होते. अखेर गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. चांदीचे दर २०००० रुपयांनी कोसळले. तर, सोन्याचे दर ४००० रुपयांनी कमी झाले आहेत.
चांदीच्या ५ मार्चच्या एक्सपायरीच्या वायद्याचे दर बुधवारी ३ लाख २५ हजार ६०२ रुपयांवर पोहोचले होते. त्यात आज १९ हजार ८४९ रुपयांची घसरण होऊन ते ३ लाख ०५ हजार ७५३ रुपयांवर पोहोचले.
सोन्याच्या दरात देखील आज घसरण झाली आहे. सोन्याचे दर ४०८५ रुपयांनी कमी होऊन १ लाख ४७ हजार ०७७ रुपयांवर आले आहेत. सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीचं प्रमुख कारण डोनाल्ड ट्रम्प यांच ग्रीनलँड आणि युरोप संदर्भातील बदललेलं धोरण कारणीभूत आहे.
सराफा बाजारात सोने आणि चांदीचे दर देखील घसरले आहेत. सराफा बाजारात चांदीचा दर १ लाख ५५ हजार १३ रुपयांनी घसरला. जीएसटीसह चांदीचा दर ३१२६९१ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याच्या दरात देखील २७२८ रुपयांची घसरण झाली. जीएसटीसह एक तोळे सोन्याचा दर १ लाख ५६ हजार ०४३ रुपये आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर २४९९ रुपयांनी कमी होऊन १ लाख ३८ हजार ७७३ रुपयांवर पोहोचला आहे. जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ९३६ रुपये आहे.






