पोलादपूरमध्ये ११ नामनिर्देशन पत्र दाखल

राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, मनसे, शेकापचे उमेदवार रिंगणात


पोलादपूर : तालुक्यात पंचायत समितीच्या चार गणांसाठी २४ तर जिल्हा परिषदेच्या दोन गटांसाठी ११ नामनिर्देशनपत्र दाखल झाली असून राष्ट्रवादी, राकाँ.शप, भाजप, शिवसेना, शेकाप, काँग्रेस, मनसे, उबाठा, जनता दल सेक्युलरचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मंगळवारी सहा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर बुधवारी २९ उमेदवारांनी अर्ज दाखल करून निवडणुकीची चुरस वाढवली आहे. लोहारे ५९ जि.प. सर्वसाधारण गटामध्ये चंद्रकांत कळंबे (शिवसेना), कृष्णा कदम (भाजपा), मुरलीधर दरेकर (शिवसेना उबाठा), एकनाथ गायकवाड (शेकाप), रझाक करबेलकर (काँग्रेस), वैभव चांदे (भाजपा), सतीष शिंदे (शिवसेना), अशा एकूण आठ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली. कापडे बुद्रुक ५८ जि.प.नामाप्र गटामध्ये डॉ.निलेश कुंभार (शिवसेना), अजय सलागरे (राष्ट्रवादी-भाजपा) आणि असे एकूण तीन उमेदवार रिंगणात आहे.


माटवण ११५ येथे नामाप्र महिला पंचायत समिती गणामध्ये शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केला नसून शेकापतर्फे सुनीता पवार, साक्षी कांबळेकर, राष्ट्रवादीतर्फे मीनाक्षी सुतार, राकाँशप पक्षातर्फे हर्षदा वरवाटकर असे एकूण चार उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. कापडे बुद्रुक ११६ सर्वसाधारण गणामध्ये शिवसेनेतर्फे अनिल दळवी आणि प्रकाश कदम, राष्ट्रवादीतर्फे अनिल मालुसरे, शेकापतर्फे मनोहर पार्टे, शिवसेना उबाठाचे पांडुरंग सोंडकर, जनतादल सेक्युलरचे भगवान साळवी, असे एकूण ८ उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले.

Comments
Add Comment

अलिबागमध्ये शेवटच्या दिवशीही अर्ज भरण्यासाठी गर्दी

७२ अर्ज दाखल; आज छाननी अलिबाग : रायगड जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता जोरदार सुरू झाली आहे. अर्ज दाखल

अलिबागमध्ये रंगणार राष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धा

देशातील १९ राज्यांचा असणार सहभाग ६५० नेमबाजांचा लागणार कस अलिबाग : रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथील

राजिप शिक्षण विभागातील कथित घोटाळ्याची समितीद्वारे चौकशी

१५ दिवसांत कारवाई न झाल्यास पुन्हा आंदोलन अलिबाग  : रायगड जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात सुरू असलेल्या कथित

जिल्ह्यात सुगंधी, आकर्षक जांभळी मंजिरी बहरली

निसर्गाचा सुगंधी आविष्कार; अभ्यासक व निसर्गप्रेमी सुखावले अलिबाग : रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य शेतांमध्ये

५९ जिल्हा परिषद, ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी २३ उमेदवारी अर्ज दाखल

अलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जिल्हा परिषद मतदारसंघ आणि ११८ पंचायत समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

नवनिर्वाचित नगरसेवकांशी परेश ठाकूर यांचा ‘सुसंवाद’

पनवेलच्या सर्वांगीण विकासाचा दिला मंत्र पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप-महायुतीने