मोहित सोमण: एकीकडे युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेमुळे आज शेअर बाजार पुन्हा सलग तिसऱ्यांदा कोसळले आहे. इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात सकाळच्या सत्रात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स ३८५.८२ अंकाने व निफ्टी ५५ अंकाने कोसळला आहे. दोन्ही बँक निर्देशांकात आज घसरण कायम राहिल्याने बाजाराचा स्तर आणखी खालावला आहे. ट्रम्प यांनी आपला मोर्चा आक्रमकपणे ग्रीनलँड कडे वळवल्याने युरोपियन युनियन व ग्रीनलँड यांनी त्यांना तीव्र विरोध नोंदविला आहे. असे असताना जागतिक गुंतवणूकदारांना युएसमधील गुंतवणूकीबाबत शाश्वती वाटत नाही. आधीच आर्थिकदृष्ट्या खालावलेल्या स्थितीत युएस असताना अमेरिकेचे विस्तारवादी धोरण जगाला पुन्हा एकदा जागतिक मंदीच्या विळख्यात नेत आहे.
आज शेअर बाजारात निफ्टी व्यापक मिडकॅप व स्मॉलकॅप, मायक्रोकॅप २५०, स्मॉलकॅप २५० या निर्देशांकात अधिक घसरण झाली असून दुसरीकडे क्षेत्रीय निर्देशांकात मेटल, फार्मा, पीएसयु बँक, ऑटो, रिअल्टी,हेल्थकेअर निर्देशांकात मोठी वाढ झाली असून सर्वाधिक घसरण आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५०, प्रायव्हेट बँक, कंज्यूमर ड्युरेबल्स, मिडिया निर्देशांकात झाली आहे.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ ईरीआयएस (८.०७%), सफायर फूडस (६.१९%), एबी रिअल इस्टेट (५.५३%), सम्मान कॅपिटल (५.१३%), इंडियामार्ट इंटरनॅशनल (५.०४%), अदानी एंटरप्राईजेस (४.३७%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण एयु स्मॉल फायनान्स बँक (६.१२%), भारती एअरटेल (५.४१%), एचडीएफसी बँक (४.९६%), डीसीएम श्रीराम (४.५३%), जेबी केमिकल्स (४.४७%), ब्रेनबीज सोलूशन (४.२४%), होनसा कंज्यूमर (४.१८%), इन्फोसिस (३.२५%), किर्लोस्कर ऑईल (३.२५%), झेन टेक्नॉलॉजी (३.०४%) समभागात झाली आहे.






