Wednesday, January 21, 2026

जागतिक अस्थिरतेचा रूपयात 'परिपाक' रूपया ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर कोसळला

जागतिक अस्थिरतेचा रूपयात 'परिपाक' रूपया ५२ आठवड्यातील निचांकी पातळीवर कोसळला

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेचा परिपाक म्हणून जागतिक बाजारपेठेत रूपया निचांकी स्तरावर पोहोचला आहे. सकाळी सत्र सुरू झाल्यानंतर रूपया थेट ०.२४% घसरत ९१.१९ या विक्रमी स्तरावर उघडला होता. सकाळी ९.५३ वाजेपर्यंत ९१.३१ रूपये प्रति डॉलर या सर्वोच्च निचांकी पातळीवर रूपया पोहोचला असून ही रूपयात झालेली ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण (All time Low) आहे. जागतिक अस्थिरतेत सातत्याने वाढ होत असताना दुसरीकडे डॉलर निर्देशांकात वाढ होत आहे. ज्याचा परिणाम इतर करन्सी बास्केटवर पडत आहे. याच कारणामुळे आज डॉलरमध्ये मोठी वाढ झाल्याने रूपया कोसळला.

गेले ४ दिवसात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली होती. त्याचा फटका आता रूपयातही दिसत आहे.

एकीकडे रूपयाचे महत्व घसरत असताना डॉलरमध्ये होणारी सातत्याने वाढ यामुळे जागतिक अस्थिरतेला ही हालचाल पुरक ठरत असल्याने भारतीय सराफा बाजारात सोन्याचांदीच्या दरातही मोठी वाढ होत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरील आपली लष्करी अधिग्रहणाची कारवाई सुरू केल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी जागतिक गुंतवणूकदारांसहित आपली नकारात्मकता शेअर बाजारात स्पष्ट केली होती.

ती अस्थिरता जागतिक पटलावर कायम राहिल्याने अंतिमतः रूपया मोठ्या प्रमाणात कोसळला आहे.काल भारतीय रुपया ९१ रूपयांच्या पातळीजवळ असुरक्षित राहण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली होती. सततच्या प्रवाहावर आधारित डॉलरच्या मागणीमुळे रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर घसरण्याचा धोका कायम असल्याचेही तज्ञांनी स्पष्ट केले होते. गेल्या चार सत्रांमध्ये रुपया घसरला असून या काळात आकडेवारीनुसार रूपयाने सुमारे १% मूल्य गमावले आहे.

गेल्या महिन्याच्या मध्यात नोंदवलेल्या ९१.०७५० या आतापर्यंतच्या नीचांकी पातळीही आज रूपयाने ओलांडली आहे.मागील सत्रात, रुपया ९०.९१ वर स्थिरावला होता त्यापूर्वी तो दिवसाच्या नीचांकी पातळीवर ९०.९९ पर्यंत घसरला होता आणि इंटरबँक ऑर्डर-मॅचिंग प्रणालीवर थोड्या वेळासाठी ९१ च्या पुढे गेला होता ज्यामुळे विक्रीच्या दबावाची तीव्रता रूपयावर अधोरेखित झाली होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >