सिडबी स्पर्धात्मक दरांवर अतिरिक्त संसाधने निर्माण करू शकणार असल्याने, एमएसएमई क्षेत्राला मिळणाऱ्या कर्जाचा प्रवाह वाढेल
सुमारे २५.७४ लाख नवीन एमएसएमई लाभार्थी जोडले जातील
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय लघु उद्योग विकास बँकेला (सिडबी) ५००० कोटी रुपयांच्या इक्विटी सहाय्याला मंजुरी दिली आहे.५००० कोटी रुपयांचे हे इक्विटी भांडवल वित्तीय सेवा विभागद्वारे (DFS) तीन टप्प्यांमध्ये सिडबीमध्ये गुंतवले जाईल,आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३००० कोटी रुपये (३१.०३.२०२५ रोजीच्या ५६८.६५ रुपये प्रति शेअर बुक व्हॅल्यू नुसार) आणि आर्थिक वर्ष २०२६-२७ व आर्थिक वर्ष २०२७-२८ मध्ये प्रत्येकी १००० कोटी रुपये (संबंधित मागील आर्थिक वर्षाच्या ३१ मार्च रोजीच्या बूक व्हॅल्युनुसार) मंजुरी देण्यात आल्याचे बँकेने आज आपल्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे.
परिणाम:
५००० कोटी रुपयांच्या इक्विटी भांडवलाच्या गुंतवणुकीनंतर, आर्थिक वर्ष २०२५ च्या अखेरीस ७६.२६ लाख असलेल्या एमएसएमईंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक सहाय्याची संख्या आर्थिक वर्ष २०२८ च्या अखेरीस १०२ लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.सुमारे २५.७४ लाख नवीन एमएसएमई लाभार्थी जोडले जातील. एमएसएमई मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध नवीनतम माहितीनुसार (३०.०९.२०२५ पर्यंत), ६.९० कोटी एमएसएमईद्वारे ३०.१६ कोटी रोजगार निर्माण झाले आहेत (म्हणजेच प्रति एमएसएमई ४.३७ व्यक्तींना रोजगार). ही सरासरी लक्षात घेता आर्थिक वर्ष २०२७-२८ च्या अखेरीस २५.७४ लाख नवीन एमएसएमई लाभार्थी जोडल्याने १.१२ कोटी रोजगारांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे.
पार्श्वभूमी:
निर्देशित कर्जावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आणि पुढील पाच वर्षांत त्या पोर्टफोलिओमध्ये अपेक्षित वाढ झाल्यामुळे, सिडबीच्या ताळेबंदावरील जोखीम-भारित मालमत्तांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे. या वाढीमुळे भांडवल-जोखमी-भारित मालमत्ता गुणोत्तर (CRAR) समान पातळीवर टिकवून ठेवण्यासाठी अधिक भांडवलाची आवश्यकता भासेल. सिडबीद्वारे विकसित केली जात असलेली, पतपुरवठ्याला चालना देण्याच्या उद्देशाने असलेली डिजिटल आणि डिजिटल-सक्षम तारण-मुक्त कर्ज उत्पादने, तसेच स्टार्टअप्सना दिले जाणारे व्हेंचर डेट, यामुळे जोखमी भारित (Risk Oriented) मालमत्तांमध्ये आणखी वाढ होईल, ज्यामुळे निरोगी CRAR राखण्यासाठी अधिक भांडवलाची गरज भासेल.
निर्धारित पातळीपेक्षा खूप जास्त असलेला निरोगी CRAR (Compound Annual Growth Rate CAGR) क्रेडिट रेटिंगचे संरक्षण करण्यासाठी महत्त्वाचा आहे. निरोगी CRAR राखल्यामुळे सिडबीला अतिरिक्त भागभांडवलाच्या गुंतवणुकीचा फायदा होईल. या अतिरिक्त भांडवलाच्या गुंतवणुकीमुळे सिडबीला वाजवी व्याजदराने संसाधने निर्माण करणे शक्य होईल, ज्यामुळे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) स्पर्धात्मक दरात पतपुरवठा वाढेल. प्रस्तावित इक्विटी गुंतवणूक टप्प्याटप्प्याने केल्यामुळे सिडबीला पुढील तीन वर्षांत उच्च तणावाच्या परिस्थितीत CRAR १०.५०% पेक्षा जास्त आणि पिलर १ व पिलर २ अंतर्गत १४.५०% पेक्षा जास्त राखणे शक्य होईल.






