Wednesday, January 21, 2026

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई..सापळा रचून दोन युवक गजाआड

शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई..सापळा रचून दोन युवक गजाआड
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर सणसवाडी परिसरात अमली पदार्थांच्या विरोधात शिक्रापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी दोन तरुण सणसवाडी भागात येणार असल्याची गोपनीय माहिती शिक्रापूर पोलिसांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार दामोदर होळकर, राकेश मळेकर आणि मच्छिंद्र निचित यांच्या पथकाने महामार्गालगतच्या एका दुकानासमोर सापळा रचला.यावेळी दोन संशयित युवक दुचाकीसह तिथे आले असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. पोलिसांच्या या कारवाईत पुणे-नगर महामार्गावर गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन युवकांना पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडण्यात आले . युवकांकडून गांजाचा साठा आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपींमध्ये किरण दत्तात्रय इंगळे (वय २३, रा. दहिवडी) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. सुरुवातीला या दोघांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र त्यांच्या जवळील पिशवीची झडती घेतली असता पोलिसांना गांजाच्या पुड्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपींजवळील एमएच १२ वायपी ०२५३ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाईल फोन आणि गांजाचा साठा असा मुद्देमाल जप्त केला आहे.
Comments
Add Comment