महापौरपदाची सोडत चक्राकार पद्धतीने?

या पध्दतीत खुल्या गटातील महापौराची शक्यता कमी


मुंबई : मुंबईच्या महापौरपदासाठी येत्या २२ जानेवारी रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही आरक्षण सोडत नगरसेवक प्रभागाच्या आरक्षणानुसार नव्याने न काढता चक्राकार पध्दतीने काढली जाण्याची शक्यता माध्यमाद्वारे वर्तवली जात आहे. मात्र, चक्राकार पद्धतीने या पदाची आरक्षण सोडत काढली गेल्यास सर्वसाधारण खुर्ला प्रवर्ग वगळता उर्वरीत सर्व प्रवर्गातील एखादे आरक्षण निघू शकते अशाप्रकारची शक्यता आहे. मागील महापौर पदासाठी खुला प्रवर्ग आणि एस सी महिला यासाठीचे आरक्षण निघालेले असल्याने या चक्राकार पद्धतीने एस सी व ओबीसीचे आरक्षण पडले जाण्याची दाट शक्यता आहे.


पालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांची नावे राजपत्रात प्रसिध्द झाली. त्यानुसार काँग्रेस पक्षाच्यावतीने नगसेवकांची नोंदणी कोकण विभागीय आयुक्तांकडे पूर्ण झाली आहे. आता भाजप, शिवसेना आणि अन्य पक्षांमधील निवडून आलेल्या नगरसेवकांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.


महापौरपदी कोण बसणार याची चर्चा सुरू असली तरी यासाठी कोणत्या आरक्षण प्रवर्गातील महापौर असेल हे निश्चित होणे आवश्यक आहे. त्यानुसार गुरुवारी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. हे आरक्षण नव्याने न काढता जुन्याच आरक्षणाचा विचार करता चक्राकार पद्धतीने काढले जाणार असल्याचे सांगण्यात आले.


आतापर्यंत महापौरपदाचे असे होते आरक्षित प्रवर्ग




  • सन २००० : सर्वसाधारण ( हरेश्वर पाटील)

  • सन२००२ : एस सी (महादेव देवळे)

  • सन २००५ : सर्वसाधारण (दत्ताजी दळवी)

  • सन २००७ : ओबीसी महिला (डॉ. शुभा राऊळ)

  • सन २००९ : सर्वसाधारण महिला (श्रद्धा जाधव)

  • सन २०१२ : सर्वसाधारण (सुनील प्रभू)

  • सन २०१४ : एस सी महिला (स्नेहल आंबेकर)

  • सन २०१७ : सर्वसाधारण (प्रि विश्वनाथ महाडेश्वर)

  • सन २०२० : सर्वसाधारण (किशोरी पेडणेकर)


कशी असते चक्राकार पद्धती :
महापौरपदासाठी मागील आरक्षण वगळून अन्य प्रवर्गाचे आरक्षण सोडतीसाठी चिठ्ठी टाकली जाते. त्यामुळे जर मागील महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील असेल पुढील आरक्षण सोडत काढताना या प्रवर्गाचा विचार केला जात नाही. त्या प्रवर्गा व्यतिरिक्त अन्य प्रवर्गातील आरक्षण चिठ्ठ्या लॉटरी सोडतीसाठी टाकल्या जातात.

Comments
Add Comment

पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल, १ एप्रिलपासून 'हे' नवे नियम होणार लागू

मुंबई : भारताचे आर्थिक वर्ष हे १ एप्रिल ते ३१ मार्च पर्यंत असते. उद्यापासून नव आर्थिक वर्ष सुरु होतंय. आणि

Mumbai Local Mega block Update : मुंबईत अचानक 'इतक्या' लोकल फेऱ्या झाल्या रद्द, आता शेवटचीही गाडी सुटणार 'या' वेळेवर

मुंबई : मुंबईत सध्या लोकलचे वेळापत्रक हे बिघडलेलं दिसत आहे. अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्या आहेत आणि बऱ्याच गाड्या

माजी खासदार राहुल शेवाळे बॉक्सिंगच्या रिंगणात; महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड

मुंबई: बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या निरीक्षकांच्या उपस्थितीत मुंबईत नुकत्याच पार पडलेल्या

Corporator Tejinder Singh Tiwana : जनसेवेचा आदर्श! नगरसेवक तेजिंदर सिंग तिवाना यांचा मोठा निर्णय

- ५ वर्षांचे संपूर्ण वेतन महापौर निधीसाठी मुंबई : जनहितासाठी एक प्रेरणादायी पाऊल उचलत नगरसेवक तेजिंदर सिंग

Narhari Zirwal : नरहरी झिरवळ व्हिडिओ प्रकरणात पहिली कारवाई; ट्रान्सजेंडरच्या भावावर मुंबईत गुन्हा दाखल, मोठी माहिती समोर

मुंबई : राज्याचे मंत्री नरहरी झिरवळ एका नवीन वादात सापडले आहेत. त्यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या

मेट्रो वूमन, कोस्टल वूमन ते पहिल्या मुंबई महापालिका आयुक्त

मुंबई: सनदी अधिकारी आश्विनी भिडे यांचे नाव उच्चारताच आपल्या मुखातून शब्द बाहेर पडतात ते म्हणजे मेट्रो व्हूमन.