उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला भीषण अपघात झाला. तांत्रिक बिघाडामुळे हवेत नियंत्रण सुटल्याने हे विमान थेट केपी कॉलेजच्या पाठीमागे असलेल्या तलावात कोसळले. विमान कोसळताच मोठा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. मात्र, प्रसंगावधान राखून दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारल्याने मोठी जीवितहानी टळली आहे. मिळालेली माहिती अशी की, भारतीय वायू सेनेचे हे प्रशिक्षणार्थी विमान सरावावर असताना अचानक त्याचा हवेत तोल गेला. प्रयागराज शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या केपी कॉलेज परिसरातील आकाशात विमानाची धडपड सुरू झाली आणि काही क्षणांतच ते कॉलेजच्या मागे असलेल्या तलावात जोरात आदळले. विमान आदळताच झालेल्या मोठ्या आवाजामुळे कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षक भयभीत झाले. विमान कोसळत असल्याचे पाहताच दोन वैमानिकांनी पॅराशूटच्या साहाय्याने विमानातून उडी मारली. ते तलावात पडले असताना स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत त्यांना सुखरूप बाहेर काढले. "आम्ही कॉलेजमध्ये असताना अचानक मोठा आवाज आला, आवाजाच्या दिशेने धाव घेतली असता तलावात विमान कोसळले होते आणि दोन जण पाण्यात अडकले होते, त्यांना आम्ही बाहेर काढले," असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अग्निशमन दल आणि वायू सेनेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले असून तलावात कोसळलेल्या विमानाचे अवशेष बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध वायू सेनेच्या वतीने घेतला जात आहे
View this post on Instagram
तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग
तांत्रिक बिघाडामुळे या विमानाला नियोजित स्थळाऐवजी राउरकेला हवाई पट्टीपासून सुमारे ९ किलोमीटर अंतरावर आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. या दुर्घटनेत विमानातील ६ जण जखमी झाले असून वैमानिकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या १० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला असतानाच अचानक तांत्रिक बिघाड झाला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैमानिकाने सुरक्षित लँडिंगचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक अडचणींमुळे विमानाला भीषण अपघात झाला. हा अपघात राउरकेला विमानतळाच्या जवळच घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. विमानातील सर्व ६ प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यापैकी मुख्य वैमानिकाला गंभीर दुखापत झाली असून त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. इतर जखमींवरही उपचार सुरू आहेत. तातडीने बचावकार्य सुरू झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.
वैमानिकांसह प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलवले
ओडिशामध्ये झालेल्या चार्टर्ड विमानान्या अपघातातून सर्व ६ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. या विमानात मुख्य वैमानिक कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांच्यासह दोन क्रू मेंबर्स आणि चार प्रवासी असा एकूण सहा जणांचा ताफा होता. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि अग्निशमन दलाने राबवलेल्या संयुक्त बचाव मोहिमेमुळे मोठी जीवितहानी टळली. विमान कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने परिसर ताब्यात घेतला आणि अग्निशमन दलाच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या. विमानाचे नुकसान झाले असतानाही बचाव पथकाने विमानाचा दरवाजा उघडून जखमींना बाहेर काढले. या अपघातात विमानात असलेल्या सहाही जणांना जखमा झाल्या आहेत. कॅप्टन नवीन कडंगा आणि कॅप्टन तरुण श्रीवास्तव यांच्यासह इतर चार प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, जर मदत पोहोचण्यास थोडाही उशीर झाला असता, तर परिस्थिती अधिक गंभीर झाली असती. सध्या अग्निशमन दलाकडून घटनास्थळी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात असून पोलीस अधिक तपास करत आहेत.






