Wednesday, January 21, 2026

सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडद्वारे क्यूट्रिनो लॅब्सचे अधिग्रहण घोषित शेअर १% उसळला

सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडद्वारे क्यूट्रिनो लॅब्सचे अधिग्रहण घोषित शेअर १% उसळला

मोहित सोमण: सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेडने आज आपल्याच मालकीची उपकंपनी (Subsidiary) सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (STL) ने १७ जानेवारी, २०२६ रोजी एक किंवा अधिक टप्प्यांमध्ये क्यूट्रिनो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड (QTrino) चे ७६.४०% पर्यंत इक्विटी शेअर भांडवल अधिग्रहित करण्यासाठी शेअर सबस्क्रिप्शन-कम-शेअरहोल्डर्स करार केला असल्याचे एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे.त्यामुळे ही अधिग्रहण करण्यात आलेली क्यूट्रिनो लॅब्स प्रायव्हेट लिमिटेड ही आय आयटी डीप-टेक सायबरसुरक्षा स्टार्टअप कंपनी आहे. कंपनी प्रामुख्याने उद्योग आणि सरकारी संस्थांसाठी किफायतशीर, अत्याधुनिक, क्वांटम-सुरक्षित सुरक्षा उपाय विकसित करते. आपला उत्पादनांच्या पोर्टफोलिओत विस्तार करण्यासाठी हे धोरण कंपनीने अवलंबिले असल्याचे स्पष्ट होते.

उपलब्ध माहितीनुसार, क्यूट्रिनोमधील बहुसंख्य भागभांडवलाच्या प्रस्तावित अधिग्रहणामुळे कंपनीला (STL) प्रगत तंत्रज्ञान आणि सायबरसुरक्षा क्षेत्रांमध्ये आपला व्यवसाय विस्तारण्यास अपेक्षित पोर्टफोलिओ वाढवण्यासाठी आपल्या उपाययोजना अधिक मजबूत करण्यास आणि सॅटिन समूहाची एकूण तांत्रिक लवचिकता वाढविण्यास मदत होईल. कंपनीने याविषयी अधिकृत विधान करताना,'हा व्यवहार पूर्ण झाल्यावर, क्यूट्रिनो एक उपकंपनी म्हणून समाविष्ट केली जाईल, जी तंत्रज्ञान-आधारित सायबरसुरक्षा व्यवसायांमध्ये समूहाच्या धोरणात्मक प्रवेशाचे प्रतीक आहे.' असे म्हटले.

कंपनीच्या व्यवस्थापनाने दूरदृष्टीच्या तत्त्वज्ञानाने प्रेरणेने सॅटिन समूह जागतिक बदलांचा अंदाज घेत आहे. नावीन्याचे धोरण स्वीकारत आपल्या भविष्यातील क्षमता उंचावण्यासाठी गुंतवणूक वाढवत असल्याचे दिसून येते. याबाबत कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटले आहे की,तंत्रज्ञान हे समूहाच्या धोरणाचा केंद्रबिंदू राहिले आहे ज्यामुळे अधिक स्मार्ट उपाय, वर्धित कार्यात्मक लवचिकता आणि शाश्वत वाढ शक्य झाली आहे. हे अधिग्रहण सॅटिनच्या या विश्वासाचे प्रतिबिंब आहे की नावीन्य आणि जबाबदार वाढ एकमेकांशी खोलवर जोडलेले आहेत, जे एक सर्वसमावेशक, लवचिक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम भविष्य घडवतात.'

या घडामोडीवर भाष्य करताना, क्यूट्रिनो लॅब्सचे संस्थापक आणि संचालक, प्रा. डॉ जवाहर सिंग म्हणाले आहेत की, सॅटिन समूहाचा मजबूत संस्थात्मक पाठिंबा, तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करणे आणि दीर्घकालीन दृष्टिकोन यामुळे, ही भागीदारी उद्योग आणि सरकारी संस्थांसाठी आमचे क्वांटम-सुरक्षित सुरक्षा उपाय पुढे नेण्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ प्रदान करते. एकत्रितपणे, आम्ही सायबर लवचिकता मजबूत करण्याचे, प्रभावी नावीन्य आणण्याचे आणि भारताच्या वाढत्या डिजिटल सुरक्षा परिसंस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे ध्येय ठेवतो.'

तसेच या घडामोडीवर भाष्य करताना, सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रुपिंदर कालिया म्हणाले,'हे सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या प्रगत, तंत्रज्ञान क्षमता निर्माण करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. डिजिटलदृष्ट्या एकमेकांशी जोडलेल्या जगात सायबरसुरक्षा अधिकाधिक महत्त्वाची ठरत असताना, QTrino चे डीप-टेक आणि क्वांटम-सेफ सुरक्षा उपाय आमच्या धोरणात्मक दृष्टिकोनाला पूरक ठरतात.ही भागीदारी नावीन्यपूर्णतेला गती देण्यासाठी, सायबर लवचिकता वाढवण्यासाठी आणि उद्योग व सरकारी संस्थांसाठी स्केलेबल, किफायतशीर सुरक्षा उपाय तयार करण्यासाठी प्रचंड क्षमता बाळगते. यामुळे सॅटिन टेक्नॉलॉजीजला पुढील पिढीच्या सायबरसुरक्षेमध्ये आघाडीवर स्थान मिळते,त्याचबरोबर सॅटिन ग्रुपच्या संपूर्ण तंत्रज्ञान परिसंस्थेला बळकटी मिळते आणि शाश्वत दीर्घकालीन मूल्य निर्माण होते.'

सॅटिन क्रेडिटकेअर नेटवर्क लिमिटेड (SCNL किंवा सॅटिन) ही देशातील एक मायक्रोफायनान्स संस्था (MFI) आहे, जी २६ राज्ये, ५ केंद्रशासित प्रदेश आणि १००००० पेक्षा जास्त गावांमध्ये कार्यरत आहे. या व्यतिरिक्त कंपनी नॉन-MFI सेगमेंटमध्ये विविध प्रकारची आर्थिक उत्पादने देखील देते, ज्यात MSME साठी कर्ज आणि परवडणाऱ्या घरांसाठी कर्जांचा समावेश आहे. एप्रिल २०१७ मध्ये, कंपनीने (SCNL) ने परवडणाऱ्या आणि सूक्ष्म-गृहनिर्माण क्षेत्रात कर्ज देण्यासाठी सॅटिन हाउसिंग फायनान्स लिमिटेड (SHFL) या पूर्ण मालकीच्या गृहनिर्माण वित्त उपकंपनीची स्थापना केली होती.

जानेवारी २०१९ मध्ये, SCNL ला सॅटिन फिनसर्व्ह लिमिटेड (SFL) द्वारे MSME व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वतंत्र NBFC परवाना मिळाला. ऑगस्ट २०२४ मध्ये, SCNL ने सॉफ्टवेअर सेवांसाठी सॅटिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड (STL) या उपकंपनीची स्थापना केली जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेऊन नाविन्यपूर्ण, जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान उपाय विकसित करण्यासाठी समर्पित आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये, सेबीने (SEBI) नियमांनुसार श्रेणी II पर्यायी गुंतवणूक निधी (AIF) म्हणून काम करण्यासाठी सॅटिन ग्रोथ अल्टर्नेटिव्हज लिमिटेडची स्थापना करण्यात आली होती जेणेकरून प्रभाव आणि सक्षमीकरणाच्या कार्याला चालना मिळेल.

कंपनीच्या मते ही कंपनी महिला उद्योजक आणि हरित उपक्रमांसाठी कार्यान्वित करण्यात आली होती. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत, सॅटिन ग्रुपच्या १६१६ शाखा होत्या आणि त्यात १६९५० कर्मचारी कार्यरत होते, जे ३३.३ लाख ग्राहकांना सेवा देतात. सकाळच्या सत्रात सॅटिन कंपनीच्या शेअर्समध्ये सुरुवातीला १% वाढ झाली आहे. सकाळी ९.४३ वाजता कंपनीच्या शेअर्समध्ये ०.३४% वाढ झाल्याने शेअर १४९.२२ रूपयांवर व्यवहार करत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >