Wednesday, January 21, 2026

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..

Dhurandhar 2:धुरंदरमध्ये 2 दिसणार हा अभिनेता..,प्रेक्षकांचा उत्साह वाढणार..
धुरंधर २: हिंदी चित्रपटसृष्टीत नुकताच प्रदर्शित झालेला ‘धुरंधर’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला.तसचं रणवीर सिंग, अक्षय खन्ना आणि संजय दत्त यांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकली आणि जगभरात तुफान कमाई केली. या यशानंतर आता दिग्दर्शक आदित्य धरच्या ‘धुरंधर २’कडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ‘धुरंधर’च्या यशानंतर दुसऱ्या भागाबाबत सतत चर्चा सुरू असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्ट्सनुसार, आदित्य धरचा आवडता अभिनेता विक्की कौशल ‘धुरंधर २’मध्ये स्पेशल अपीयरन्स अर्थात कॅमियो करताना दिसू शकतो. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ‘धुरंधर’ आणि ‘उरी : द सर्जिकल स्ट्राईक’ यांच्यातील कनेक्शनमुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. ‘धुरंधर’च्या पहिल्या भागाच्या क्लायमॅक्समध्ये रणवीर सिंगच्या पात्राचे नाव जसकीरत सिंह रांगी दाखवण्यात आले होते. हेच नाव ‘उरी’ चित्रपटात कीर्ती कुल्हारीने विक्की कौशलच्या पात्राच्या पतीचे नाव म्हणून घेतले होते. त्यामुळे ‘धुरंधर युनिव्हर्स’ तयार होत असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, विक्की कौशल ‘धुरंधर २’मध्ये मेजर विहान शेरगिलच्या भूमिकेत काही अॅक्शन सीन्स करताना दिसू शकतो. जरी त्याची भूमिका छोटी असली, तरी ती कथेसाठी महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. या वरुन सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहे. आदित्य धर या चित्रपटाबाबत सर्व तपशील गुप्त ठेवत असून, प्रेक्षकांसाठी काही मोठे सरप्राइजेस तयार करण्यात येत आहेत.
Comments
Add Comment