Bigg Boss Marathi 6 : बिग बॉस मराठी सीझन ६ मधील स्पर्धक व नृत्यांगना राधा पाटील सध्या बिग बॅासच्या घरात आणि बाहेरही चर्चेचा विषय ठरत आहे. सुरुवातीला शांत आणि अलिप्त दिसणारी राधा आता हळूहळू आपली भूमिका ठामपणे मांडतानाही दिसत आहे. गौतमी पाटील सोबतच्या जुन्या वादामुळे ती चर्चेत आली होती पण आता तिच्या खेळामुळे आणि वैयक्तिक आयुष्याविषयी केलेल्या खुलास्यामुळे पुन्हा एकदा लक्ष वेधून घेत आहे.
घरात चारित्र्यहननाच्या मुद्द्यावरून राकेश, अनुश्री आणि रुचिता जामदार यांच्यात जोरदार वाद रंगलेला असताना, त्याच एपिसोडमध्ये राधाने तिच्या खासगी आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. अनुश्रीशी बोलताना राधाने सांगितले की ती गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि सध्या ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहते. राधाच्या मते, तिचा प्रियकर अत्यंत प्रेमळ आणि काळजीवाहू आहे. “माझा स्वतःचा २ बीएचके फ्लॅट आहे. आम्ही दोघंही तिथे राहतो. तो असा आहे की जर कोणी मला काही बोललं, तर तो ते सहन करणार नाही,” असं ती भावनिक होत सांगते. तिने हेही नमूद केलं की तिच्या बॉयफ्रेंडला कोणतेही व्यसन नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्याने स्वतःच्या हाताने कधी जेवणही केलं नाही; तीच त्याला नेहमी भरवते.
या चर्चेदरम्यान अनुश्रीने राधाच्या बॉयफ्रेंडबद्दल मोठी कबुली दिली. ती म्हणाली की ती त्याच्या गाण्यांची चाहती आहे. यावरून राधाचा प्रियकर एक लोकप्रिय गायक असल्याचं स्पष्ट झालं. राधानेही सांगितलं की अनेक जण त्याच्यावर फिदा आहेत, मात्र तो नेहमी तिचाच हात घट्ट धरून असतो.