मुंबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना इंदूरच्या अहिल्याबाई होळकर स्टेडियममध्ये पार पडला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये न्यूझीलंडने दमदार पुनरागमन केलं. दोन्ही सामन्यांमध्ये डॅरिल मिचेल भारतीय संघावर भारी पडला. दोन्ही सामन्यांमध्ये शतक झळकावून तो न्यूझीलंड संघासाठी विजयाचा हिरो ठरला.
मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजयाची नोंद केली होती. पण त्यानंतर पुढील दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. डॅरिल मिचेल दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघावर भारी पडला. मालिकेतील तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक होता. हा सामना जिंकून भारतीय संघाला मालिका जिंकण्याची संधी होती. पण शेवटी न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय संघावर भारी पडले. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला हा सामना गमवावा लागला.
या सामन्यानंतर बोलताना कर्णधार शुभमन गिल म्हणाला, ‘आमचा संघ त्यांना हरवण्यासाठी सर्वात मजबूत संघ होता. पण त्यांनी आम्हाला गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही मागे टाकले. न्यूझीलंडचा संघ भारतीय संघापेक्षा एक पाऊल पुढे होता.






