मोहित सोमण : आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जागतिक अस्थिरतेचा मोठा फटका बसल्याने सेन्सेक्स १०६५.६१ अंकाने कोसळत ८२१८०.४७ पातळीवर व निफ्टी ३५३ अंकाने कोसळत २५२३२.५० पातळीवर स्थिरावला आहे. मोठ्या प्रमाणात परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सेल ऑफ कायम ठेवल्याने बाजारात घरगुती गुंतवणूकदारांनी सावधगिरीची भूमिका कायम ठेवली असून आपले नफा बुकिंग सुरू ठेवले होते. क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील लक्ष गुंतवणूकदारांनी केंद्रित केल्याने एकूणच बाजारातील निर्देशांकात मात्र धुळधाण उडाली आहे. एकूणच सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात घसरण मिळाल्याने बाजारात सपोर्ट लेवल मिळाली नाही. युएसने धरलेले धोरण मारक ठरल्याने क्षेत्रीय निर्देशांकात भयानक मोठा फटका बसला. ऑटो (२.४८%), फायनांशियल सर्विसेस एक्स बँक (१.२१%), आयटी (२.०६%), मेटल (१.८९%), मिडिया (१.७५%), कंज्यूमर ड्युरेबल्स (२.८०%), रिअल्टी (५.०४%) निर्देशांकात तुफान घसरण झाली आहे. व्यापक निर्देशांकात निफ्टी नेक्स्ट ५०, बँक, मिडकॅप सिलेक्ट, स्मॉलकॅप १०० निर्देशांकात फार मोठी घसरण झाली आहे.
युएसने ग्रीनलँडवर केलेला दावा, युएसने युरोपियन देशांवर ८ फेब्रुवारीपासून १०% अतिरिक्त टॅरिफ शुल्क लावण्याची घोषणा तसेच आशियाई बाजारातील कमकुवत आर्थिक आकडेवारी, युएस बाजारातील फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील अनिश्चितता, कमोडिटीत सुरु असलेली वादळी वाढ, एकूणच युद्धभूमीमुळे निर्माण होत असलेली भौगोलिक अस्थिरता यामुळे जागतिक शेअर बाजारात 'हडकंप' झाला आहे. परिणामी भूराजकीय परिणाम, जागतिक अस्थिरता, व कमोडिटीतील वाढ, डॉलर निर्देशांकात होणारी वाढ, कंसोलिडेशन फेजमध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काढून घेतलेली गुंतवणूक या एकत्रित कारणांमुळे मोठा फटका भारतीय बाजारात बसला असून गुंतवणूकदारांनी नवी खरेदी न करता बाय ऑन डिप्स हे धोरण अवलंबिले असल्याचे दिसत आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ दीपक नायट्रेट (४.४२%), जिंदाल सौ (४.१९%), हिंदुस्थान झिंक (३.८०%), जेके सिमेंट (१.८४%), सन टीव्ही नेटवर्क (१.८२%, क्रिष्णा इन्स्टिट्युट (०.९७%), गोदरेज इंडस्ट्रीज (०.७६%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण न्यूजेन सॉफ्टवेअर (१४.५२%), डेटा पँटर्न (९.४७%), युपीएल (८.०९%), ओबेरॉय रिअल्टी (७.९२%), ज्योती सीएनसी ऑटो (७.७३%), आयएफसीआय (७.३२%), एचबीएल इंजिनिअरिंग (६.७२%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना जिओजित इन्व्हेसमेंट लिमिटेडचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले आहेत की,' ट्रम्प-युगातील टॅरिफवरील अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी देशांतर्गत बाजारपेठा सावध राहिल्या, अमेरिकेच्या व्यापार धोरणावरील अनिश्चिततेमुळे अलिकडच्या एकत्रीकरणाला मुदतवाढ मिळाली. सतत एफआयआयचा बाहेर पडण्याचा प्रवाह, वाढती अमेरिकन आणि जपानी बाँड उत्पन्न आणि कमकुवत होत चाललेला रुपया यामुळे गुंतवणूकदारांच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला. मिड- आणि स्मॉल-कॅप समभागांनी बेंचमार्कपेक्षा कमी कामगिरी केली आणि सर्व क्षेत्रांमध्ये भावना मोठ्या प्रमाणात नकारात्मक होती. नजीकच्या काळात, बाजारातील भावना कमाईच्या हंगामावर अवलंबून राहतील, तर भू-राजकीय घडामोडी आणि जागतिक व्यापार परिस्थिती हे महत्त्वाचे प्रभाव राहतील.'
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'दिवसभर सततच्या विक्रीच्या दबावामुळे बेंचमार्क प्रमुख तांत्रिक आधारांच्या जवळ आले असल्याने भारतीय शेअर बाजारांनी सत्राचा शेवट खूपच कमकुवत केला. निफ्टी २५,५८० वर कमकुवत झाला, काही काळासाठी २५,५८५ च्या जवळ स्थिर होण्याचा प्रयत्न केला, परंतु विक्री वेगाने वाढली, ज्यामुळे निर्देशांक २५,३४७ च्या इंट्राडे नीचांकी पातळीवर पोहोचला. बेंचमार्क दिवसाच्या नीचांकी जवळ बंद झाला, ज्यामुळे बाजारात मंदीची भावना असल्याचे दिसून आले. बाजाराची व्याप्ती अत्यंत नकारात्मक राहिली, संपूर्ण बोर्डवर विक्रीचा दबाव दिसून आला. सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल रंगात बंद झाले, जे व्यापक-आधारित जोखीम टाळण्याचे प्रतिबिंबित करते.
विक्रीचा सर्वाधिक फटका रिअल्टी क्षेत्राला सहन करावा लागला, जवळजवळ ४.६% ची घसरण झाली, तर इतर चक्रीय आणि दर-संवेदनशील क्षेत्रांमध्येही लक्षणीय घट झाली.
जागतिक व्यापार तणाव वाढल्याने आणि परकीय भांडवलाच्या बाहेर जाण्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर दबाव आला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक युरोपीय राष्ट्रांवर नवीन कर लादण्याची धमकी दिल्यानंतर चिंता पुन्हा निर्माण झाली, ज्यामुळे जागतिक व्यापारात पुन्हा एकदा व्यत्यय येण्याची भीती निर्माण झाली. त्याच वेळी, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी सतत विक्री केल्याने देशांतर्गत शेअर बाजारातील घसरणीचा दबाव वाढला. जागतिक स्तरावर वाढलेली अनिश्चितता आणि घसरत्या शेअर बाजारांमुळे गुंतवणूकदार सुरक्षित-निवासी मालमत्तेकडे वळले, सोने आणि चांदीचे व्यवहार विक्रमी उच्चांकावर पोहोचले.
तांत्रिक दृष्टिकोनातून, निफ्टीचा तात्काळ आधार २५,११४ च्या जवळ आहे, जो २०० दिवसांच्या मूव्हिंग सरासरीशी जुळतो, तर प्रतिकार (Resistance) २५५०० पातळीवर राहतो. आधार क्षेत्राच्या खाली एक निर्णायक हालचाल भावना आणखी कमकुवत करू शकते, तर कोणत्याही पुनर्प्राप्तीला उच्च पातळीवर कठोर प्रतिकाराचा सामना करावा लागू शकतो'






