गेल्या काही दिवसांपासून मराठी फ्लीट इंडस्ट्रीमध्ये लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या मुलाच्या साखरपुड्याची चर्चा सुरु आहे. त्याने अभिनेत्री पूजा बिरारीची लहान केले. त्यांनतर आता प्रसिधद अभिनेता प्रसाद ओक आणि मंजिरी ओक यांच्या मुलाचा साखरपुडा झाला आहे. मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या साखरपुड्याला हजेरी लावली. त्यांचे फोटो समोर आले आहेत.
अभिनेता प्रसाद ओकचा मुलगा सार्थकच १९ जानेवारीला साखरपूडा पार पडला आहे, त्यांनी रितूंशी लग्न केलं आहे. साखरपुड्याला सार्थकने फिकट पिस्ता रंगाची हाफ शेरवानी घातली आहे. त्यावर खाली पांढऱ्या रंगाची पँट घातली आहे. तर सार्थकची होणारी पत्नी रितूने फिकट गुलाबी रंगाचा घागरा घातला आहे.
प्रसाद ओक आणि त्याची पत्नी मंजिरीने लेकाच्या साखरपुड्यासाठी मॅचिंग कपडे घातले आहेत. मंजरी ओकने फिकट हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. त्यावर सुंदर अशी ज्वेलरी परिधान केली आहे. तर प्रसाद ओकने हिरव्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर जॅकेट घातला आहे. तर दुसरीकडे रितूच्या आई-वडिलांनी रितूला मॅचिंग असे गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत.
कलाकारांनी लावली साखरपुड्याला हवेरी
सार्थकच्या साखरपुड्याला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. त्यामध्ये प्रसाद ओकची जवळची मैत्रिणी अमृता खानविलकरचा सहभाग आहे. अमृता खानविलकर आईसोबत प्रसादच्या लेकाच्या साखरपुड्याला पोहोचली होती. तसेच अभिनेता स्वप्निल जोशी, अभिनेता समीर चौघुले देखील हजर होता. आता सार्थकचे लग्न कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






