कोण जाणे कैसी परी। पुढे उरी ठेविता ।। अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण ॥ तुका म्हणे अवधी जोडी। वे आवडी चरणांची ॥
टणारी कामेही सोपी, सुलभ वाटू लागतात. या अभंगात संत तुकाराम म्हणतात, 'भक्तिरंगाच्या वाटेवर वाटचाल करताना आपल्या आजूबाजूच्या परिसरातील समविचारी लोकांना भेटावे, त्यांच्याशी अध्यात्मिक विषयावर संवाद करावा, एकमेकांना आपल्या अडचणी सांगाव्यात आणि त्यावर उपाय शोधावेत. यामुळे दोघांचीही प्रगती होते.
आपल्या आयुष्यात भक्तीची संधी आली तर ती वाया घालवू नये. पुढे भविष्यात वा म्हातारपणी नामस्मरण करू, अशी चालढकल करू नये. पुढच्या काळात आपल्याला वेळ मिळेलच, असे नाही. आणि वृद्धपणापर्यंत आपण जगणारंच आहोत याचा कुठलाही भरवसा नाही. म्हणून आजब परमेश्वराचे चिंतन करावे. इतरांनाही सांगावे. त्यामुळे एकमेकांचा उत्साह वाढेल. धन्यतेची अनुभूती येईल. ईश्वराचे ठायी श्रद्धा आणि भक्ती ठेवली तर सारे आयुष्यच ईश्वरमय होईल. सर्वत्र आनंदाची पखरण होईल.
आपल्या आयुष्यात परस्पर सहकार्याने मोठमोठी कामे सहजपणे साध्य होतात. कामाची विभागणी झाल्यामुळे कुणा एकावर कामाचा अनावश्यक भार पडत नाही. एकमेकांच्या सहकार्याने व्यवहारातील वा अध्यात्मातील अनेक अडचणी दूर करता येतात. अनके अडथळ्यांवर मात करून इच्छीत कार्य साध्य करता येते.
संत समाजाचे मार्गदर्शक असतात. आपले चरित्र आणि विचार याद्वारा ते समाजमानाचे प्रबोधन करीत असतात. 'एकमेका साह्य करू' या ओळीमधून मानवता, प्रेम, आपुलकी, स्नेह, सद्भावना आदी भावना प्रकट होतार होतात. संत तुकारामांचा काळ हा परकी जुलमी सत्तेचा होता. अनके प्रकारचे अन्याय, जुलूम यामुळे लोक हवालदिल झाले होते. धार्मिक क्षेत्रात कर्मकांडाचा नावाखाली लोकांचे पद्धतशीर शोषण सुरू होते. नीतिमत्ता आणि मानवी मूल्याची घसरण झाली होती.
या पार्श्वभूमीवर 'अवधे धरू सुपंथ' ही संत तुकारामांची प्रतिज्ञा फार महत्त्वाची आहे. या ओळीद्वारा सत्य, नीती, सात्त्विकता, विवेक, त्याग, परोपकार, समर्पण या मूल्यांचा आविष्कार होतो. नितीसंपन्न, सुसंस्कृत समाज घडविणे हे संतांचे ध्येय होते. संतांनी केवळ अध्यात्मच सांगितले नाही तर संपन्न समान घडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.






