Tuesday, January 20, 2026

जागतिक अस्थिरतेचा कमोडिटीत वणवा सोने चांदी सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकावर चांदीत एक दिवसात १०००० रूपयांनी वाढ

जागतिक अस्थिरतेचा कमोडिटीत वणवा सोने चांदी सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकावर चांदीत एक दिवसात १०००० रूपयांनी वाढ

मोहित सोमण : जागतिक अस्थिरतेचा वणवा आजही कायम राहिल्याने सलग दुसऱ्या दिवशी कमोडिटी बाजारात अत्योच्च अस्थिरता व वाढ झाल्याने सोने चांदी आणखी एक नव्या उच्चांकावर पोहोचले आहेत. त्यामुळे या किंमती थेट ५२ आठवड्यातील सर्वोच्च पातळीवरही पोहोचल्या आहेत. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात १०४ रूपयाने, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ९५ रूपयाने, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७८ रूपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १४७२८, २२ कॅरेटसाठी १३५००, १८ कॅरेटसाठी ११०४६ रूपयांवर पोहोचला आहे. माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति तोळा दरात १०४६, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति तोळा दरात ९५० रूपये, १८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ७८० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १४७२८०, २२ कॅरेटसाठी १३५०००, १८ कॅरेटसाठी ११०४६० रूपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील सराफा बाजारात सोन्याचे प्रति ग्रॅम सरासरी दर २४ कॅरेटसाठी १४७२८, २२ कॅरेटसाठी १३५०० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) मध्ये सोन्याचा दर दुपारपर्यंत १.७१% वाढ झाल्याने १४८१३३ रूपयांवर व्यवहार करत आहेत. उपलब्ध माहितीनुसार, गेल्या १० दिवसात सोन्याचा प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी ७००, व २२ कॅरेटसाठी ५०० रूपयांनी उसळला आहे.

जागतिक पातळीवर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत २.७१% वाढ झाल्याने प्रति डॉलर दरपातळी ४७१९.६४ प्रति औंसवर व्यवहार करत आहे. आज सोन्याने चक्क ४७२० औंस प्रति डॉलर ही सर्वोच्च पातळी गाठली होती.

एकीकडे मंगळवारी आशियाई व्यापारात सोन्याच्या किमतींनी विक्रमी उच्चांक गाठला असताना आता जागतिक कमोडिटी बाजारात युएसने ग्रीनलँडवर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे गुंतवणूकदारांनी आणखी सावधगिरीची भूमिका पत्करली. अमेरिकेच्या ग्रीनलँडच्या मागणीबद्दलच्या चिंतेमुळे व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नवी जोखीम न घेता करत असलेल्या हेजिंगमुळे सुरक्षित आश्रयस्थानांकडे लक्ष गुंतवणूकदारांनी वळवले आहे.

युएस राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांवर अतिरिक्त १०% टॅरिफची घोषणा केली जी ८ तारखेपासून लागू होऊ शकते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युरोपियन देशांना ग्रीनलँड देईपर्यंत कर आकारणी करणार असल्याचे सांगितल्यानंतर या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या असल्या तरी मंगळवारी चांदीने काही प्रमाणात नफा कमावला होता. काल मात्र मोठ्या प्रमाणात चांदी उसळत इतिहासात पहिल्यांदाच ३०५००० प्रति किलो टप्पा चांदीने पार पाडला.

चांदीच्या दरातही तुफान वाढ 

अस्थिरतेच्या युगात आज चांदीनेही तडाखा दिला आहे. कमोडिटी बाजारातील अस्थिरतेत चांदीही आज नव्या शिखरावर पोहोचली आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात आज १० रूपये व प्रति किलो दरात १०००० रुपयांनी वाढ झाली त्यामुळे प्रति ग्रॅम दर ३१५ रूपये व प्रति किलो दर ३१५००० रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति किलो दर ३१५००० रूपयावर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या दरातही दुपारपर्यंत २.४०% वाढ झाल्याने दरपातळी ३१७०० रूपयांवर पोहोचली आहे. जागतिक स्तरावर पाहिल्यास सिल्वर फ्युचर निर्देशांक ६.४३% वाढत ९४.१५ प्रति औंसवर चांदीची दरपातळी गेली आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >