डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचा इशारा
तेहरान : इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यावरील कोणताही हल्ला हा संपूर्ण इराणविरुद्ध उघड युद्ध मानला जाईल, असे म्हणत अमेरिकेला कडक इशारा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी झालेल्या जोरदार वादानंतर हा इशारा देण्यात आला आहे.
पेझेश्कियान यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हा इशारा दिला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये,”आमच्या महान नेत्यावर हल्ला हा इराणविरुद्ध पूर्ण-प्रमाणात युद्धासारखा असेल” असे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी दिलेल्या एक मुलाखतीत इराणला नवीन नेतृत्वाची आवश्यकता आहे, असे म्हटले. त्यानंतर पेझेश्कियान यांनी हा इशारा दिला. इराणी अध्यक्षांनी लिहिले आहे की, “आमच्या महान नेत्यावर कोणताही हल्ला हा इराणी राष्ट्राविरुद्ध पूर्ण-प्रमाणात युद्धासारखा असेल.” .






