Tuesday, January 20, 2026

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर; पाच बहिणींचा एकटा भाऊ, शेतात पतंग उडवताना थेट ...

अकोला : अकोला जिल्हातील मुर्तिजापूर येथे पतंग उडवण्याचा नादात एका १० वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे. आता पर्यंत चायना मांज्यामुळे अनेक घटना घडत होत्या, परंतु पतंग उडवताना मृत्यू झाल्याची हे पहिलीच घटना समोर आली आहे. मृत्यू झालेल्या बालकाचं नाव हे उमर शेख फकिरा असं आहे.

मुर्तिजापूर येथील शेतात एक चिमुकला पतंग उडवत होता. त्याच शेतात एक पडकी आणि उघडी विहीर होती. पतंग उडवताना भान न राहिल्यामुळे चिमूचा हा विहारात पडला. चिमुकला विहिरीत पसरण्याची वार्ता गावभर पसरता सगळे गावकरी विहिरीपाशी गोळा झाले, परंतु तेव्हा खूप उशीर झाला होता. चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.

ही विहीर गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक अवस्थेत उघडी होती. या पूर्वीही या विहीरीत जनावरे पडून नुकसान झाले आहे . मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही खबरदारी घेण्यात आली नाही . घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या माध्यमातून पिंजर संत गाडगेबाबा बचाव आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने विहिरीत उतरून बालकाचा मृतदेह बाहेर काढला.

उमर हा पाच बहिणींमधील एकमेव भाऊ होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उघडी व असुरक्षित विहीर मृत्यूकडे निमंत्रण देत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून या दुर्घटनेला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार अजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >