Monday, January 19, 2026

२ ब मार्गिकेवरील शून्य पुलाचे काम पूर्ण

२ ब मार्गिकेवरील शून्य पुलाचे काम पूर्ण

मुंबई : मेट्रो लाईन २बी वरील शून्य ब्रिजचा अंतिम पायलन घटक यशस्वीपणे उभारण्यात आला असून, हा ब्रिज आता आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘झिरो’ आकारात अभिमानाने उभा आहे. वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) वाकोला नाल्यावर हा पूल उभारण्यात आला आहे. हा आकार जगाला शून्य ही संकल्पना देणाऱ्या महान गणितज्ञ आर्यभट्ट यांना समर्पित आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिली. १३० मीटर लांबीचा हा केबल-स्टेड ब्रिज, वाकोला नाल्यावर ८० मीटरचा मुख्य स्पॅन आणि ४० मीटर उंच स्टील पायलन असलेला, अभियांत्रिकी कौशल्याचा उत्कृष्ट नमुना आहे. ७५० मेट्रिक टन वजनाचा हा पायलन, १० प्री-फॅब्रिकेटेड घटकांतून उभारण्यात आला असून, जवळपास ५.९ किमी इतक्या जटिल वेल्डिंगचे काम प्रत्यक्ष साईटवर पूर्ण करण्यात आले.

७५० एमटी आणि ३५० एमटी क्षमतेच्या सुपर-लिफ्ट क्रेन्सच्या सहाय्याने अंतिम क्राऊन घटक बसवून ‘शून्य’चा हा आयकॉनिक आकार पूर्णत्वास नेण्यात आला. भारताच्या बौद्धिक वारशाला अभिवादन करत आधुनिक शहराच्या भविष्यास आकार देणारा हा एक ऐतिहासिक टप्पा आहे. हा संपूर्ण पूल ज्या कमानीच्या आधाराने उभा आहे त्याचा आकार शून्यासारखा आहे.

Comments
Add Comment