Pune Municipal Corporation Election 2026 : सई थोपटे या तरुणीने अतिशय लहान वयात पुणे महानगरपालिकेत मोठं यश मिळवित इतिहास रचला आहे.ती पुण्याची सर्वात तरुण नगरसेवक बनली आहे. भाजपने पुणे महानगरपालिका निवडणुकीत सई थोपटेला उमेदवारी दिली होती, त्यानंतर सई चर्चेत आली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात यश मिळताच सईच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. तिने मित्र-मैत्रिणींसोबत आनंद साजरा केला. सई थोपटे पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेजमध्ये बीबीएसच्या शेवटच्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. सई थोपटे अत्यंत कमी वयात पुण्याची नगरसेवक बनली आहे.
भाजपच्या तिकिटावर पुण्यात नगरसेवक बनलेली सई थोपटे हिची राजकारणातील एन्ट्री रंजक होती. त्या दिवशी सई सिम्बायोसिस कॉलेजमध्ये लेक्चरला बसली होती. तेव्हाच तिला गुड न्यूज मिळाली. भाजपने सईला पुणे महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक ३६ (c) मधून उमेदवारी दिली होती. यानंतर तिने उमेदवारी अर्ज दाखल केला. सई थोपटे हिला एकूण २०,७९७ मतं मिळाली. सईचा राजकारणातील प्रवेश खूपच फिल्मी होता. तिच्या मैत्रिणींनीही तिच्या निवडणूक प्रचारात तिला पाठिंबा दिला.
ABVP शी आहे संबंध...
मिळालेल्या माहितीनुसार, सई गेल्या अनेक वर्षांपासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलेली आहे. स्वयंसेवी उपक्रम, जागरूकता मोहिम यामाध्यमातून सईने पुण्यात शिक्षण, विद्यार्थ्यांचे कल्याण, रोजगाराच्या संधी आणि युवा हक्क यासारख्या मुद्द्यांवर काम केलं आहे. पुण्यात भाजपचा सामना अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) विरुद्ध झाला. भाजपने पुण्यात सत्ता कायम ठेवली. भाजपच्या विजयासह सई थोपटेने इतिहास रचला आहे. सईच्या विजयासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजकीय प्रवास चर्चेत आला आहे. तेदेखील २२ व्या वर्षी नगरसेवक आणि २७ व्या वर्षी नागपूरचे महापौर बनले होते.






