गंभीर गुन्ह्यातील उमेदवारांना मतदारांची पसंती
मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी ‘धक्कादायक’ विजयांची नोंद झाली आहे. ती म्हणजे गंभीर गुन्ह्याचा आरोप असलेल्या अनेक उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी जालना महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. पांगारकर यांची काही दिवसांपूर्वीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.
पुण्यामध्ये राष्ट्रवादीने आयुष कोमकर हत्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या सोनाली आंदेकर व लक्ष्मी आंदेकर यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दोघींचा विजय झाला आहे. सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर जेलमध्ये असताना आंदेकर कुटुंबीयांकडून प्रचार केला जात होता. सध्या त्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.
अलिशा खान यांचा विजय : नागपूर महापालिका निडणुकीत पोलिसांनी नागपुरात महालसह इतर भागात उसळलेल्या दंगलीचा मास्टरमाईंड ठरवलेल्या फहीम खानची पत्नी अलिशा खान ही ‘एमआयएम’ची उमेदवार नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली आहे.