तांत्रिक विद्यालय व शास्त्र - व्यावसायिक आिण उच्च माध्यमिक - व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय
SHARADASHRAM VIDYAMANDIR
Technical High School & Jr. College of Science - Vocational and HSC - Vocationa
मुंबई, दादर : दादर येथील मध्यवर्ती भागातील शारदाश्रम विद्यामंदिर शाळेने गेल्या वर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने कै. बाबुराव तथा सदानंद परुळेकर यांनी ही संस्था १९४९ साली सुरू केली होती.
संस्थेची प्रगती आणि उद्दिष्ट्ये :
- संस्थेची सुरुवात कै. बाबुराव परुळेकर यांच्या पत्नी कै. सुशीला (इंदूताई) परुळेकर यांच्या प्रेरणेने १९४८मध्ये बालकमंदिराने झाली.
- १९४९ मध्ये प्राथमिक वर्ग आणि १९५१ मध्ये माध्यमिक वर्ग सुरू झाले.
- शिक्षण कार्यातील अडचणींवर मात करत, संस्थेने १९६१ साली चार मजली इमारत उभी केली.
- संस्थेने १९६१ मध्ये तांत्रिक शिक्षणाची आणि १९६६ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या वर्गांची भर घातली.
- कै. के. एन. सामंत यांच्या कार्यकाळात १९७५-७६ मध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे (वाणिज्य व तांत्रिक शास्त्र) वर्ग सुरू झाले.
- संस्थेत १९९४ साली स्वतंत्र तांत्रिक विभाग सुरू करण्यात आला.
- 'ज्ञान-शील-शक्ती' हे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेचे ध्येय उत्तम नागरिक घडवणे हे आहे.
- आज ही संस्था ७००० हून अधिक विद्यार्थ्यांसह वटवृक्षाच्या रूपात उभी आहे.
- माजी विद्यार्थ्यांचा देशाला गौरव:
- शाळेने भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर व श्री. विनोद कांबळी यांसारखी क्रीडा क्षेत्रातील रत्ने घडवली आहेत.
- सध्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री श्री. सुरेश प्रभू आणि मुंबईच्या माजी महापौर श्रीमती विशाखा राऊत या देखील शारदाश्रमच्या माजी विद्यार्थिनी आहेत.
- याशिवाय, श्री. अजित आगरकर, श्री. दिलीप प्रभावळकर, श्री. अविनाश नारकर यांसारखे अनेक गुणी विद्यार्थी-विद्यार्थिनी विविध क्षेत्रांत संस्थेचे नाव मोठे करत आहेत. संस्थेची ही ७५ वर्षांची अमृतमहोत्सवी वाटचाल ही समाजकार्याची आणि ज्ञानाची क्रांतीच आहे.
१९९४ मध्ये मा. कै. श्री. प्रभाकर केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालय व शास्त्र व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय हा स्वतंत्र विभाग सुरू करण्यात आला. आतापर्यंत या विभागातील कै. श्री. प्रभाकर केळकर, कै. श्री. प्रकाश वैद्य, श्रीम. अर्चना कुलकर्णी व श्री. अरुण करदेकर यांना महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट व्यावसायिक शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत तसेच सद्या कार्यरत असलेल्या शारदाश्रम तांत्रिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सन्मा. श्रीम. मेधा अभय पाटील यांना त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी आठ राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेले आहेत.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान (२०२४-२५) URC1 स्तरावर शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाला पहिल्या पाच शाळांमध्ये नामांकन मिळालेले आहे.
माननीय श्री. गजेंद्र शेट्टी सर हे शारदाश्रम विद्यामंदिर ट्रस्टचे सचिव तसेच शारदाश्रम विद्यामंदिर इंग्रजी माध्यमाचे शालेय समिती अध्यक्ष आहेत. इतक्या उदंड उत्साही व्यक्तिमत्त्वाचे, काटेकोर नियोजन करणारे, निर्णायक अंमलबजावणी करणारे आणि प्रेरणादायी दृष्टिकोन असलेल्या व्यक्तीचे अस्तित्व ही आमच्यासाठी गौरवाची बाब आहे. शेट्टी सर यांचे मत आहे की, "शिक्षण हे एक समाज घडवण्याचे महत्त्वाचे साधन आहे" - एक असा समाज जो गतीशील, उत्पादक आणि सर्वांना संधी व न्याय देणारा असेल. सरांचा ठाम विश्वास आहे की, कष्ट आणि चिकाटी हाच यशाकडे जाण्याचा खरा मार्ग आहे. शेट्टी सर हे मुंबई विद्यापीठाचे वाणिज्य शाखेतील पदवीधर असून त्यांनी "बिझनेस मॅनेजमेंट" या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. याशिवाय, सरांनी "शिपिंग मॅनेजमेंट" या विषयात विशेषतः आयात आणि निर्यात व्यवस्थापन यामध्येही डिप्लोमा प्राप्त केला आहे. सरांना क्रीडेची विशेष आवड असून विशेषतः हॉकी आणि क्रिकेट हे खेळ त्यांना अतिशय प्रिय आहेत.
1. रोटरी क्लब मुंबई साऊथतर्फे, रोटरी गव्हर्नर मा. श्री. अरुण भार्गव यांच्या हस्ते" Nation Builder Award, 2023"
दि. 06.10.2023 स्थळ-गिरगाव, मुंबई.
2. स्वराज्य वेल्फेकर असोसिएशन मुंबई, अंडर द एजिस ऑफ प्रोजेक्ट 100, नवी दिल्लीतर्फे माजी कुलगुरू डॉ. श्री. भालचंद्र मुणगेकर यांच्या शुभ हस्ते "Ideal Teacher Mumbai Award 2024”
दि. 30.03.2024 स्थळ-दादर,मुंबई.
3. *संजीवनी फाउंडेशन, महाराष्ट्र राज्यतर्फे, पद्मश्री बीज माता माननीय श्रीमती राहिबाई पोपेरे यांच्या शुभ हस्ते मानाचा व प्रतिभावंत "श्री शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव राज्यपुरस्कार 2024"
दि. 21.08.2024 स्थळ-सिन्नर, नाशिक.
4. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन ट्रस्ट वरळी, मुंबईतर्फे
मा. आमदार श्री. सचिनभाऊ अहिर यांच्या शुभ हस्ते
"आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार "2024.
दि.18.09.2024 स्थळ:-वरळी, मुंबई.
5. पहाट फाउंडेशन, शेगाव* **तर्फे
माननीय श्री. अमोल भिलंगे यांच्या शुभ हस्ते राष्ट्रसंत गाडगेबाबा राज्यस्तरीय "आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार 2025"
दि.23.02.2025 स्थळ : शेगाव, बुलढाणा.
6. आनंदगंगा फाउंडेशन, कोल्हापूरतर्फे मा. श्री. प्रवीण यादवसो यांच्या शुभ हस्ते "राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापिका" पुरस्कार
दि. 09.03.2025 वडगाव, कोल्हापूर.
7.साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन, ***महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यातर्फे
मा. श्री. रामजीत गुप्ता यांच्या शुभ हस्ते "महाराष्ट्र रत्न गौरव आदर्श मुख्याध्यापिका पुरस्कार"2025.
दि.23.03.2025. सदाशिव पेठ, पुणे.
8. साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्यतर्फे
माननीय श्री. बाळराजे वाळूजकर (अभिनेता) यांच्या शुभ हस्ते
“राष्ट्रीय भारतभूषण पुरस्कार 2025"
दि. 24.08.2025 सदाशिव पेठ, पुणे.
शारदाश्रम विद्यामंदिर, गुणगौरव* समारंभात शैक्षणिक वर्ष 2024-25 मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉ. विकास महात्मे* व शारदाश्रम संस्थेचे कार्यवाह श्री. शेट्टी सर, उपाध्यक्ष श्री. पिंटो सर, खजिनदार श्री. आजगांवकर व प्रशासकीय प्रबंधक श्रीमती वनजा मोहन यांच्या शुभ हस्ते गौरव करण्यात आला.
दि. 19.09.2025 दादर, मुंबई.
१. मुंबई : दादर (प.) येथील डॉ. भवानी शंकर रोडवरील शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयात (TECHNICAL HIGH SCHOOL) इयत्ता ८वी व ९वीच्या इंग्रजी माध्यम तसेच सेमी इंग्लिश माध्यमाच्या वर्गांसाठी प्रवेश दिला जातो. सन १९६१ पासून इ. ८ वी ते १० वी पर्यंत दर्जेदार तांत्रिक शिक्षण देणारी ही शासनमान्य व अनुदानित माध्यमिक शाळा असून शासकीय नियमांनुसार फी अत्यंत माफक आहे.
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान ( २०२४-२५) URC1 स्तरावर शारदाश्रम विद्यामंदिर तांत्रिक विद्यालयाला पहिल्या पाच शाळांमध्ये नामांकन मिळालेले आहे.
इयत्ता ८वी, ९वी व १०वीसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, गणित, विज्ञान या विषयांसह मेकॅनिकल तंत्रज्ञान (९१) आणि इलेक्ट्रिकल तंत्रज्ञान (९२) हे तांत्रिक विषय शिकवले जातात. SKILL INDIA (NSQF)अंतर्गत हा टेक्निकल स्कोरींग विषय असून यात अभियांत्रिकी चित्रकला, थिअरी, वर्कशॉप प्रॅक्टिकल्स, CAD इत्यादींचा समावेश आहे. तांत्रिक विषय घेऊन SSC उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये 25% आरक्षण उपलब्ध असते. डिप्लोमानंतर थेट इंजिनीअरिंग डिग्रीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळाल्याने बारावी बोर्ड परीक्षा व CET परीक्षा द्यावी लागत नाही. संस्थेच्या लौकिकामुळे
विद्यार्थ्यांना उत्तम रोजगार संधीही प्राप्त होतात. दहावीनंतर विद्यार्थी ITI मध्येही प्रवेश घेऊ शकतात.
सुमार बुद्धिमत्ता व बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांसाठीही तांत्रिक शिक्षण हा एक उत्तम पर्याय आहे.
संस्थेच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये अत्याधुनिक तांत्रिक कार्यशाळा
(CNC मशीनसह), अद्ययावत संगणक कक्ष, प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय, रोटरी क्लबकडून शिष्यवृत्ती योजना, तसेच उच्च प्रशिक्षित शिक्षकवर्ग यांचा समावेश आहे. प्रत्येक वर्गात स्मार्ट पॅनेलची सोय उपलब्ध करून अध्यापन अधिक आकर्षक व परिणामकारक करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रिकेट कोचिंग, कबड्डी कोचिंग, तंत्र प्रदर्शन, औद्योगिक क्षेत्रभेट, तज्ज्ञ अतिथी व्याख्यान, योग शिबीर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्पोर्ट्स, शालेय व आंतरशालेय स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदी विविध उपक्रमांचे आयोजन नियमित केले जाते. तांत्रिक विषयांच्या कार्यशाळांचे माहितीपूर्ण व्हिडीओही संस्थेच्या यूट्युब चॅनलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. तसेच दरवर्षी १५ डिसेंबर रोजी शाळेत तंत्र प्रदर्शन व सर्वांसाठी अभिमुखता कार्यक्रम (ओरिएंटेशन प्रोग्राम) आयोजित केला जातो. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त या तांत्रिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मेधा अभय पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यालयाचा निकाल १००% लागला आहे.
२. शारदाश्रम विद्यामंदिर शास्त्र व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय, JUNIOR COLLEGE OF SCIENCE VOCATIONAL (Bifocal)
सन १९७८ पासून इ. ११ वी व १२ वी शारदाश्रम ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स व्होकेशनल हा प्रतिष्ठित आणि शासनमान्य (Govt.–Aided) विभाग व्यावसायिक शिक्षणाची भक्कम परंपरा जपत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम बनवत आहे. एस.एस.सी.नंतर विद्यार्थ्यांना विज्ञानासोबत व्यावसायिक क्षेत्रातही उत्तम प्रगतीची संधी देण्याचे कार्य हे कॉलेज अनेक वर्षे यशस्वीरीत्या पार पाडत आहे.
या कॉलेजमध्ये Physics, Chemistry , Mathematics, English या विषयांसोबत कोणत्याही एका व्यावसायिक शाखांमध्ये जसे इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल मेंटनन्स, इलेक्ट्रिकल मेंटनन्स या aided शाखांसह कॉम्प्युटर सायन्स (Computer Science) या Unaided शाखेत प्रवेश देऊन सखोल तांत्रिक ज्ञान दिले जाते. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी ५० विद्यार्थी क्षमता उपलब्ध आहे.
विशेष वैशिष्ट्ये —
- अत्यंत माफक फी.
- विद्यार्थ्यांच्या प्रगतीची खात्री.
- सुस्थापित पायाभूत सुविधा व अत्याधुनिक कार्यशाळा आणि प्रयोगशाळा.
- गुणवत्ता असलेला उत्साही व अनुभवी शिक्षकवर्ग.
- विद्यार्थ्यांना मिळणारे वैयक्तिक मार्गदर्शन.
- स्मार्ट पॅनेलवर आधुनिक अध्यापन.
- औद्योगिक क्षेत्रभेट, शैक्षणिक सहल, तज्ज्ञांचे अतिथी व्याख्यान, उत्कृष्ट निकाल व शिस्तबद्ध वातावरण इ. आहेत.
तांत्रिक क्षेत्रात उज्ज्वल करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम मोठा लाभदायक ठरतो. पुढे डिप्लोमा इंजिनीअरिंग, मरिन इंजिनीअरिंग, नेव्ही, आर्मी, आय.टी.आय., एन.एस.एस., बी.एस्सी. आयटी अशा विविध अभ्यासक्रमांत प्रवेशाच्या उत्तम संधी विद्यार्थ्यांसाठी खुल्या आहेत. विशेष म्हणजे, किमान ६०% गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षांत प्रवेश मिळू शकतो.
आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण विभागाच्या फ्रीशिप/शिष्यवृत्तीची सुविधा उपलब्ध आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया असून नाममात्र शुल्क आकारले जाते. विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मेधा पाटील यांनी केले आहे.
३. सन १९८८ पासून तंत्रज्ञानाच्या जगात भविष्य घडवणारी विश्वासार्ह शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असणाऱ्या तसेच महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट व्यवसाय शिक्षक पुरस्कार प्राप्त शारदाश्रम विद्यामंदिर उच्च माध्यमिक व्यावसायिक कनिष्ठ महाविद्यालय (JUNIOR COLLEGE OF HSC VOCATIONAL)
पूर्वीचे नाव MCVC असणाऱ्या (एम्. सी. व्ही. सी. ज्युनियर कॉलेज इ. ११ वी, १२ वी) या कॉलेज मध्ये एस.एस.सी. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात इंग्रजी व मराठी, GFC या विषयांसोबत पुढील कोणत्याही एका Aided व्यावसायिक शाखेत प्रवेश मिळू शकतो.
मेकॅनिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी हे विषय शिकवले जातात.
दहावी पास (फक्त दोन विषयात ATKT)असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या संधीचा लाभ मिळू शकतो.
महाविद्यालयाच्या विशेष सुविधा :
- अत्यंत माफक फी.
- सुस्थापित वर्कशॅाप आणि आधुनिक पायाभूत सुविधा.
- अनुभवी व उत्साही शिक्षकवर्ग.
- विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन.
- शैक्षणिक व औद्योगिक भेटी.
- स्मार्ट पॅनेल सुविधा.
- उल्लेखनीय निकाल.
- शिस्तबद्ध शैक्षणिक वातावरण.
- विषयतज्ज्ञांचे अतिथी व्याख्यान.
- तांत्रिक प्रदर्शनांचे आयोजन
- On Job Training
एच. एस. सी. नंतर उपलब्ध शैक्षणिक पर्याय :
- तसेच B.A., B.Sc., B.Com., B.Voc., B.M.M., B.A.F., B.B.A., B.M.S. इत्यादी विविध शाखांमध्ये प्रवेशाची संधी उपलब्ध आहे.
- विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी ही सुवर्णसंधी असल्याचे प्रतिपादन
प्राचार्या सौ. मेधा पाटील यांनी केले आहे.