Sanjay dutt tesla cybertruck: बॉलीवूड अभिनेता संजय दत्त धुरंदर नंतर पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी कारण त्यांचा आगामी चित्रपट नसून, त्यांची फ्युचरिस्टिक आणि आलिशान कार Tesla Cybertruck आहे. नुकतेच संजय दत्त यांना मुंबईच्या रस्त्यांवर Tesla Cybertruck चालवताना पाहण्यात आले असून, त्याचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या अनोख्या इलेक्ट्रिक पिकअप ट्रकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये Tesla Cybertruck चा दमदार, हटके आणि भविष्यातील वाहनासारखा दिसणारा डिझाइन स्पष्टपणे दिसून येतो. मात्र या गाडीबाबत सर्वाधिक चर्चा तिच्या नंबर प्लेटवरून होत आहे. नंबर प्लेट पाहता ही गाडी भारतात अधिकृतपणे लॉन्च झालेली नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय दत्त यांची ही Tesla Cybertruck दुबईतून भारतात आणण्यात आली असण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ही गाडी कार्नेट परमिट अंतर्गत भारतात आणण्यात आली आहे. कार्नेट परमिटच्या माध्यमातून परदेशी वाहन काही ठराविक कालावधीसाठी भारतात इम्पोर्ट ड्युटी न भरता चालवता येते. त्यामुळे सध्या भारतात Tesla ची अधिकृत विक्री सुरू नसतानाही ही गाडी रस्त्यावर धावताना दिसत आहे.
Tesla Cybertruck ही गाडी तिच्या स्टेनलेस स्टील बॉडी, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शक्तिशाली परफॉर्मन्स साठी ओळखली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात या गाडीची किंमत सुमारे 60,000 ते 1,00,000 डॉलर्स दरम्यान असून, भारतीय चलनात ती किंमत कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते. संजय दत्त यांना नेहमीच मोठ्या, दमदार आणि पॉवरफुल SUVs ची आवड राहिली आहे. त्यांच्या गॅरेजमध्ये आधीच अनेक लक्झरी गाड्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना खास Willys Jeep सोबतही पाहण्यात आले होते. त्यामुळे Tesla Cybertruck त्यांच्या कलेक्शनमध्ये सामील होणं त्यांच्या रफ-टफ व्यक्तिमत्त्वाला साजेसंच असल्याचं मानलं जात आहे.