मुंबई (प्रतिनिधी) : पीपीएफएएस म्युच्युअल फंडचा न्यू फंड ऑफर (एनएफओ) पराग पारिख लार्ज कॅप फंड आज १९ जानेवारी २०२६ रोजी सुरू होत असून हा ३० जानेवारी २०२६ पर्यंत सुरू राहील. त्यानंतर ६ फेब्रुवारी २०२६ रोजी ही योजना पुन्हा सुरू होईल. हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय मानला जात आहे.
फंड हाऊसची स्थापना झाल्यापासून ही योजना सातवी ऑफरिंग आहे. ही योजना किफायतशीरपणे मोठ्या लार्ज-कॅपमध्ये गुंतवणूक करण्याची सुविधा देते, जेथे ट्रेडिंग व प्रभावी खर्चांचे व्यवस्थापन करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या दृष्टिकोनाचा अवलंब केला जातो. काळासह कार्यक्षम साधनांचा वापर करत आणि लहान सक्रिय शेअर कायम ठेवत पोर्टफोलिओची स्थिती योजनेच्या बेंचमार्कच्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या योजनेसाठी किमान गुंतवणूक १,००० रूपये असेल आणि त्यानंतर १ रूपयाच्या पटीत गुंतवणूक करता येऊ शकते. यामध्ये कोणतेही प्रवेश किंवा निर्गमन शुल्क आकारण्यात येणार नाही. डायरेक्ट व रेग्युलर प्लॅन्स ग्रोथ आणि इन्कम डिस्ट्रिब्युशन कम कॅपिटल विद्ड्रॉवल पर्याय देतील.
पीपीएफएएस म्युच्युअल फंडचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नील पराग पारिख म्हणाले, ''अनेक गुंतवणूकदार लार्ज-कॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात, जे पारदर्शक, कमी खर्चिक व सातत्यपूर्ण असतात. हा फंड या गरजांची पूर्तता करण्यासाठी लाँच करण्यात आला आहे, तसेच स्मार्ट अंमलबजावणी व किफायतशीरपणावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यामुळे अंतिम गुंतवणूकदाराला उत्तम फायदे मिळतील.''






